ताज्या बातम्या

Aadhar card |शेवटची संधी ! पॅन – आधार लिंक करून घ्या नाहीतर दंड भरा !

आधार पॅन – लिंक लवकरात लवकर करून घ्या –

आधार कार्ड व पॅन कार्ड या अतिशय महत्त्वाचे कागदपत्र (documents) आहेत. जवळपास प्रत्येक सरकारी सुविधेचा (government facility) लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड द्यावे (Information)लागते. तुम्ही अजून हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक ( Pan – Aadhaar Link ) केलेले नसेल तर सरकार तुम्हाला शेवटची संधी देत आहे .यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. थेट 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचा अलर्ट आयकर विभागानेच जारी(Information) केला आहे. तुम्ही जर पॅनकार्ड लिंक केलं नसेल तर आताच करून घ्या कारण वेळ खूप कमी उरला आहे. आयकर विभागाने मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करण्याची मुदत दिली आहे. दंड ( penalty) भरूनच त्याचा संबंध जोडता येणार आहे. या काळात मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड अवैध मानले जाणार नाही. तोपर्यंत दंड भरून तुम्ही कधीही पॅन-आधार लिंक करू शकता.

वाचा: बापरे!नोव्हेंबर ची थंडी आटोक्यात, मात्र डिसेंबर मध्ये कडाक्याची थंडी सह पावसाची शक्यता ..!

पॅन आधार लिंक करण्याची मुदत वाढणार नाही –

लवकरात लवकर आपले पॅन आधार लिंक करून घ्या कारण आता ही मुदत वाढणार नाही. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करणं बंधनकारक असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. त्यापूर्वी लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा. ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द समजण्यात येईल आणि ते ‘निरुपयोगी’ होईल. कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामात याचा पुन्हा वापर (Information)करता येणार नाही. 1 जुलैपासून पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी 1000 रुपये दंड आकारण्यात आला होता. मार्च २०२३ पर्यंत ही( Penalty) पेनल्टी 1000 रुपये असणार आहे. मात्र त्यानंतर जर तुम्ही पॅनकार्ड आधारला लिंक करायचा प्रयत्न केला तर होणार नाही. शिवाय तुमचं पॅनकार्ड सुद्धा इनवेलीड ( Invalid) मानले जाईल.

वाचा: ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..

अशा पद्धतीने करा ऑनलाइन PAN-Aadhaar लिंक –

1) जर तुमचं अकाउंट तयार झालेलं नसेल तर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करा.
2) 2)आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फाइलिंग बेवसाईटवर जा.
3)वेबसाईटवर ‘लिंक आधार’ ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
4)लॉगइन केल्यानंतर तुमच्या अकाउंटच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा.
5)प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल. तो सिलेक्ट करा. तिथे दिलेल्या सेक्शनमध्ये आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
6) सर्व माहिती(Information) भरल्यानंतर खाली दिलेल्या ‘लिंक आधार’ ऑप्शनवक क्लिक करा. त्यानंतर तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button