ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Bank Holiday | मार्च महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद! शेतकऱ्यांनो फुकट खेट्या मारण्यापूर्वीच वाचा यादी

Bank Holiday | आर्थिक उलाढालींसाठी मार्च महिना विशेष ओळखला जातो. दरम्यान या महिन्यात एकूण बारा दिवस बँका बंद असणार आहेत. आठड्याच्या सुट्ट्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या सुट्ट्यांचा यादीनुसार या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी म्हणजेच 11 आणि 25 मार्चला सर्व बँका बंद राहणार आहेत.

RBI च्या वेबसाईटवर सुट्ट्या जाहीर

दरम्यान मार्चमधील चार रविवारी म्हणजेच 5, 12, 19 आणि 26 तारखेला सुद्धा बँका बंद असणार आहेत. तसेच विविध राज्यांमध्ये सर्व प्रादेशिक सुट्ट्यांना देखील बँका बंद असणार आहेत. या सुट्ट्यांच्या बाबत हा त्या त्या राज्यसरकारने घेतलेला असतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती देण्यात आलेली नाही.

ऑनलाइन बँकिंगमुळे गैरसोय टळणार

मार्च महिन्यात बँका बंद राहणार असल्या तरी, ऑनलाइन बँकिंग सेवा उपलब्ध असल्याने ग्राहकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. बँकांच्या ऑनलाइन सेवांमुळे बँक व ग्राहक यांच्यावरील ताण देखीक कमी झालेला पहायला मिळत आहे.

म्हणून सुट्ट्या जाहीर केल्या जातात

आजकाल ऑनलाइन बँकिंग होत असले तरी याठिकाणी काही व्यवहारांमध्ये मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुट्ट्यांबाबत पूर्वकल्पना असावी व त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी RBI च्या अधिकृत वेबसाईटवर सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात येते.

मार्च मधील सुट्ट्यांची यादी

1) ३ मार्च : चापचार कुट
2) मार्च: रविवार
3) 7 मार्च: होळी, होळी (दुसरा दिवस), होलिका दहन, धुलंडी , डोल जत्रा
4) 8 मार्च: धुलेती ,डोलजात्रा, धुलिवंदन, याओसांग दुसरा दिवस
5) 9 मार्च : होळी
6) 11 मार्च: महिन्याचा दुसरा शनिवार
7) 12 मार्च: रविवार
8) 19 मार्च : रविवार
9) 22 मार्च: गुढी पाडवा, उगाडी सण, बिहार दिवस, साजिबू नोंगमापनबा (चेरोबा), तेलुगु नववर्ष दिवस, पहिला नवरात्र
10) 25 मार्च: महिन्याचा चौथा शनिवार
11) 26 मार्च : रविवार
12) 30 मार्च : श्रीराम नवमी

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Reserve bank of india updated bank holidays in march

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button