ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Electricity | भारीच की! आता जेवढे पैसे तेवढीच वीज, जास्तीच्या वीज बिलापासून सुटका

Bil | आता घरगुती वीज ग्राहकांना ऊर्जा कंपनीकडून लवकरच स्मार्ट मीटर मिळणार आहेत. मोबाइल सीम कार्डप्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड आणि प्रीपेडमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे ग्राहकांना जेवढी वीज वापरली असेल तेवढेच बिल अदा करावे लागणार आहे. याबाबतच्या अंमलबजावणीला आता सध्या सुरुवात झाली असून, सर्वात आधी मुंबई, पुणे व इतर मेट्रोसिटीत हे मीटर बसविण्यास सुरुवात झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

याच दरम्यान, प्रीपेड मीटर हे अगदी मोबाइलच्या सीमकार्डसारखे काम करते. जसे की आपल्याला महिन्याला कॉलिंग किंवा डेटा वापरण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो त्यानंतर ठरावीक दिवसांपर्यंत किंवा तुमच्या वापरानुसार रिचार्ज सुरू राहते. त्यानंतर संपते, तसेच वीज बिल प्रीपेड मीटरबाबत असणार आहे. या प्रीपेड वीज मीटरला आधी रिचार्ज करावे लागेल, त्यानुसार तुमच्या वापरानुसार पैशांची कपात होत राहणार आहे.

स्मार्ट वीज मीटरचे काय फायदे आहेत?

  • मोबाइलच्या सीमकार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल.
  • वीज वापरानुसारच बिल येईल, तसेच प्रीपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल.
  • स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाणार आहे. मीटरमध्ये छेडछाड करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल, तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होणार आहे.
  • स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पद्धतीने माहितीची देवाण-घेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीत कमी वेळेत करता येईल.

वाचा: खरिपातील नुकसान भरपाईबाबत कृषी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, जाणून घ्या कशी मिळणार भरपाई

आता महावितरणचे आर्थिक गणित सुधारणार

आता सध्या वीज मीटरचे बिल हे दर महिन्याला तयार होत असते. त्याचा भरणा ग्राहकांनी ठरलेल्या वेळेत न केल्यास वीज कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. ही अडचण सोडविण्यासाठी आता स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. प्रीपेड मीटर लावल्याने वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती ही सुधारणार आहे, अशी आशा महावितरणने कंपनीने व्यक्त केली आहे.

जानेवारीनंतर सोलापुरात बसविणार स्मार्ट मीटर

सध्या स्मार्ट मीटरच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून आता लवकरच ती पूर्ण होईल. सप्टेंबर महिन्यात मुंबई, पुणे व अन्य शहरांत स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात होणार आहे. जानेवारी २०२३ नंतर सोलापूर जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यास प्रारंभ होईल. तसेच सुरुवातील घरगुती ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

वाचा: जपान सरकारकडून तरुणांना दारू पिण्याच आवाहन, जाणून घ्या काय आहे कारण

सुरुवातील सध्या घरगुती मीटर बदलणार

आता स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम ही जानेवारी २०२३ नंतर सोलापूर जिल्ह्यात सुरू होणार असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्यानुसार सुरुवातीला घरगुती ग्राहकांचे मीटर हे बदलण्यात येणार आहेत, आणि त्यानंतर औद्योगिक वीज ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहेत. वाणिज्यिक, कृषी व इतर ग्राहकांबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Now common people will get relief as they will get electricity as much as they pay;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button