ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
नाशिक

खरंच? नाशिक बाजार समितीमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतोय? “ईडी” कडे केली तक्रार…

नाशिक बाजार समितीमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतोय असा आरोप करत नगरसेवक दिनकर पाटील आणि भाजपचे शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी थेट ‘ईडी’ (ED) कार्यालयास तक्रार अर्ज दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीसोबत हे देखील सांगितले आहे की या बाजार समितीत मागचे 20 वर्ष करोडेंचे भ्रष्टाचार होत आले आहेत.

एका वर्षाच्या सरकारी लेखा परिक्षण अहवालात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तर 20 वर्षात किती?

जर एका वर्षात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तर २० वर्षांत हा आकडा निश्चितच हजारो कोटींच्या घरात झाली. हे आरोप गंभीर केले आहेत. यामध्ये जे दोषी असतील ज्यांच्यामुळे शासनाचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था निवडणुकीत दिनकर पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. हा पराभव त्यांना पचत असल्याने ते सैरभैर झाल्याचे दिसून येते. तसेच दोनच दिवसांपूर्वी तज्ज्ञ संचालकपदाचीही निवड करण्यात आली. त्या वेळी दिनकर पाटील यांनी माझ्यासह सभापती व अन्य संचालकांना शिवीगाळ केली. तसेच संचालक मंडळाने शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांचे संचालकपद देखील रद्दबाबत ठराव केला आहे. त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे देखील बोलले जात आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button