ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

ATM Card | एटीएम कार्ड घरी विसरलात? काळजी करू नका, आता एटीएम कार्डशिवाय काढता येणार पैसे

लोकांना आपल्या बचतीची ठेव ठेवण्यासाठी व काढण्यासाठी बँका सेवेत आहेत. मात्र, दरवेळी लोकांना बँकेत जाऊन पैसे काढणे शक्य नसते.

ATM Card | बँकांमध्ये असलेल्या गर्दीमुळे लोकांना पुढच्या कामासाठी जाण्यासाठी विलंब होत होता. केवळ पैसे काढण्यासाठी नागरिकांचा जास्तीत जास्त वेळ जात होता. त्यामुळे लोकांच्या सेवेत एटीएम सेवा आणली. यामुळे लोक चौकाचौकात किंवा आपल्या जवळपासच्या ठिकाणी एटीएममध्ये जाऊन पैसे काढू शकत आहेत. लोकांना यासाठी बँकेकडून एटीएम कार्ड देण्यात आले आहे. एटीएम मशीनमध्ये एटीएम कार्ड (ATM Card) घातल्याशिवाय पैसे निघत नव्हते. परंतू, आता याबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. खरं तर, नागरिकांसाठी ही एक खूशखबरच आहे. कारण आता पैसे काढण्यासाठी एटीएमची गरज भासणार नाही.

पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची नसणार आवश्यकता

भारतीय रिझर्व बँक (RBI) लवकरच NPCI, ATM नेटवर्क आणि बँकांना प्रत्येक बँकेच्या ATM मधून कार्डलेस कॅश विथड्रॉवल सेवा (Cardless ATM cash withdrawal from any bank ATM) सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. यामुळे आता लोकांना एटीएम कार्डची गरज भासणार नाही. त्याचबरोबर ही प्रणाली इंटरऑपरेबल असणारं आहे. याचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात होणार नाही. यापूर्वी एका बँकेचे ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकत नव्हते. मात्र आता सर्वच ग्राहक या नव्या प्रणालीच्या माध्यमाद्वारे एकाच एटीएममधून पैसे काढू आहेत.

वाचा: Agriculture Annual Income Tax | शेतकरीही आयकर विभागाच्या रडारवर, ‘या’पेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना कर अधिकाऱ्यांच्या कडक तपासनीला जावं लागणार सामोरं

काय म्हणाले आरबीआयचे गव्हर्नर?
या संदर्भात आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, “या सेवेमुळे ग्राहकांची सोय वाढेल. तसेच एटीएममध्ये फसवणुकीच्या घटना कमी होतील.” त्याचबरोबर भारतातील काही बँकांद्वारे कार्ड लेस कॅश ही सेवा देण्यात येत आहे.

वाचा: SBI Insurance | मोठी बातमी; SBI देत आहे 2 लाख रुपयांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स, ग्राहकांनो त्वरित घ्या असा लाभ…

‘या’ बँका देतात कार्ड-लेस कॅश काढण्याची सेवा

सध्याही देशातील काही बँका कार्ड-लेस कॅश काढण्याची सेवा देतात. यामध्ये आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे. बँकांची ही सेवा सध्या ऑन-अँड-ऑन म्हणजे बँकेचे ग्राहक त्यांच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएम मशीनवरून ही सेवा घेऊ शकतात. परंतू, आता भारतीय रिझर्व्ह बँकेला ही सेवा UPI आधारित करून इंटरऑपरेबल बनवायची आहे. SBI चे ग्राहक असले तरी देखील ते कार्डशिवाय HDFC बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँपवर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button