lang="en-US"> पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी जमीन खरेदी प्रक्रिया सुरु, १०० कोटीं रुपयांचा

पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी जमीन खरेदी प्रक्रिया सुरु, १०० कोटीं रुपयांचा पहिला टप्पा केला वर्ग..

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी लागणाऱ्या जमीन खरेदी प्रक्रिया लगेच सुरु होणार आहे. आवश्यक असलेली जमीन मोजणी पूर्ण होत आल्याची माहिती दिली आहे. याचबरोबर जागेची रक्कम निश्चित करून हवेली तालुक्यातून पैसे वाटप प्रक्रिया सुरु देखील केली आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून १०० कोटींचा पहिला टप्पा जिल्हाधिकार्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

यावर्षी रल्वे मार्गाला परवानगी मिळाली असून सध्या भूसंपादनाचे काम चालू आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व गावातील जमीन मोजणी करून झाली आहे. तसेच जमिनीचे दर निश्चित करून खरेदी प्रक्रिया सुरु देखील झाली आहे. यासाठी शासनाने १०० कोटींचा पहिला टप्पा रिलीज केला आहे. त्यामुळे जमीन खरेदी गतीने होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव, आणि जुन्नर तालुक्यातील ५४ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. हवेली तालुक्यात पैसे वाटप प्रक्रिया सुरु आहे.

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे –
पुणे जिल्ह्यातील एकूण गावे – ५४
हवेली तालुक्यातील गावे – १२
खेड तालुक्यातील गावे – २१
आंबेगाव तालुक्यातील गावे – १०
जुन्नर तालुक्यातील गावे – ०८

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Exit mobile version