lang="en-US"> Onion Export Ban | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय! निवडणुकीच्या धामधुमीत - मी E-शेतकरी

Onion Export Ban | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय! निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातमधून कांद्याच्या निर्यातीस मंजुरी, राज्यातील शेतकऱ्यांचा रोष

Onion Export Ban | देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात कांद्यावर निर्यात बंदी असताना, केंद्र सरकारने निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातमधून २००० मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस (Onion Export Ban) मंजुरी दिल्याने राज्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गुजरातमधील कांद्यालाच निर्यातीची परवानगी:

केंद्र सरकारने मुंद्रा पोर्ट, पिपाव पोर्ट आणि महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या जेएनपीए बंदरातून गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्रातील कांद्यावर ८ डिसेंबर २०२३ पासून बंदी घातली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान:

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर सारख्या कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी या निर्णयामुळे संताप्त आहेत. यावरून अनेकदा आंदोलनेही करण्यात आली आहेत आणि बाजार समित्या बंद ठेवल्या गेल्या आहेत.

महाराष्ट्रातील कांद्याला भाव नाही, गुजरातमधील कांद्याला निर्यातीची परवानगी:

राज्यात लाल आणि उन्हाळी कांदा देशभरातील बाजारपेठेत कवडीमोल भावाने विकला जात आहे. अशावेळी केंद्र सरकारने फक्त गुजरातमध्ये पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस २५ एप्रिल रोजी परवानगी दिली आहे.

एनसीएलऐवजी थेट निर्यातदारांना मंजुरी:

या निर्णयानुसार गुजरातचा २००० मेट्रिक टन कांदा एनसीएलच्या ऐवजी थेट निर्यातदारांच्या माध्यमातून निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे.

वाचा: अर्रर्र…! वीज दरवाढीने शेतकऱ्यांची कंबरडे मोडणार; लगेच पाहा किती रुपये युनिटने वीज मिळणार?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय:

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. निवडणुकीच्या आधी मतांसाठी शेतकऱ्यांना फसवणूक दिली जात आहे आणि निवडणुकीनंतर त्यांच्यावर अन्याय केला जात आहे.

शेतकऱ्यांसाठी न्याय मिळणे गरजेचे:

या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि केंद्र सरकारकडून तात्काळ निर्णय बदलण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी राज्य सरकारनेही तातडीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या पोरांसाठी सुवर्णसंधी! 4 हजार 660 जागांसाठी रेल्वे विभागात अर्ज सुरू, ‘असा’ करा अर्ज

Exit mobile version