ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

LPG Price | सामान्यांच्या खिशाला कात्री, घरगुती गॅसच्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयांची वाढ

गृहिणींना स्वयंपाक करणे पुन्हा एकदा महाग झाले आहे. होय, एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) ग्राहकांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

LPG Price | घरगुती सिलिंडरच्या (एलपीजी सिलेंडर) दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅससोबतच (Domestic gas) व्यावसायिक गॅसच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. आज म्हणजेच 19 मे रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 3 रुपये 50 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial gas cylinder price hike) दरात 8 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

‘इतक्या’ रुपयांनी झाली वाढ
आज घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 3 रुपये 50 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर देशात घरगुती एलपीजी सिलिंडरचा आकडा 1000 च्या पुढे गेला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आजपासून दिल्ली आणि मुंबईमध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1003 रुपये, कोलकाता 1029 रुपये, चेन्नई 1018.5 रुपये झाली आहे.

वाचाElderly Care Act | म्हातारपणी मुलं सांभाळत नाहीत? तर काळजी करू नका, कायद्याच्या आधारे मिळवा अधिकार

मे महिन्यात सिलिंडरचे दोनदा वाढले दर
याआधी 7 मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती. यानंतर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली होती. तर यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरही झाला महाग
घरगुती एलपीजी व्यतिरिक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडर देखील 8 रुपयांनी महाग झाला आहे. आजपासून 19 किलो वजनाचा सिलेंडर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईमध्ये 2507 रुपयांना मिळणार आहे. 7 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडर 10 रुपयांनी स्वस्त झाला होता.

वाचाLPG Cylinder | काय सांगता! आता ओल्या कापडानेच मोजता येणार शिल्लक गॅस, वाचा अनोखी ट्रिक

गॅसच्या सातत्याने होतेय वाढ
यंदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 250 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर त्याची किंमत 2253 रुपयांवर गेली होती. यापूर्वी 1 मार्च 2022 रोजी व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 105 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमती (एलपीजी प्राइस हायक) वाढवण्याची जोरदार प्रक्रिया सुरू आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button