ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना भरावा लागणार एवढ्या कोटींचा दंड; महावितरण ची थकबाकी वसुली मोहीम सुरू

सोलापूर : महावितरणने (MSEDCL) अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली असून शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या 6 हजार 80 कोटींच्या थकबाकीवर महावितरणने 1600 कोटींचा दंड व व्याज (interest) लावले आहे. यामध्ये यंत्रणा दुरुस्तीही सुरु झाली असून थकबाकी नसलेल्या गावांमध्ये सुरुवातीला यंत्रणा दुरुस्ती (repairing) करण्यात येणार आहे.

वाचा –

एक दिवस एक गाव मोहीम

जिल्ह्यातील यंत्रणा दुरुस्ती मोहीम वेगाने सुरु असून महावितरण मधील अधिकाऱ्यांनी ‘एक गाव एक मोहीम’ उपक्रम हाती घेतला आहे. सोलापूर जिह्यातील सुमारे 279 गावांमध्ये हा उपक्रम सुरू असून नियोजित गावांमध्ये महावितरण चे कर्मचारी, दुरुस्ती कामे करणारे ठेकेदार , ठेकेदारांचे कर्मचारी यंत्रणा दुरुस्ती साठी जातात. तारांचा झोळ काढणे,खांबांना ताण देणे, गंजलेल्या रोहित्र पेट्या बदलणे, किटकॅट आणि स्पेअर्स बसविणे अशी कामे एक गाव एक मोहीम अंतर्गत केली जात आहेत. ज्या गावांची थकबाकी कमी आहे अशाच गावांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी प्राधान्य (priority) दिले जात आहे.

कृषी धोरणामुळे रकमेचा भार कमी होणार

शेतकऱ्यांच्या थकबाकी मुक्तीसाठी सरकारने महावितरण ने कृषी धोरण 2020 आणले होते. या कृषी धोरणानुसार थकबाकीच्या 50 टक्के रक्कम सप्टेंबर नंतरचे चालू बिल असे एकूण 2675 कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत फक्त 196 कोटींचाच भरणा झाला आहे. मार्च नंतर मात्र शेतकऱ्यांना 100 % थकबाकी भरावी लागणार आहे.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button