ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Maharashtra Changes from 1st April 2022 | 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात होणार अनेक नवे बदल, मास्कमुक्तीसह सर्व सामान्यांच्या खिशालाही बसणार फटका; ‘ते’ बदल कोणते?

आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे नागरिकांना कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक होते. मात्र, आता सरकारने (Government) हे नियम हटवून नागरिकांना एक प्रकारे मोठं गिफ्टच दिले आहे.

Maharashtra Changes from 1st April 2022 | आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे नागरिकांना कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक होते. मात्र, आता सरकारने (Government) हे नियम हटवून नागरिकांना एक प्रकारे मोठं गिफ्टच दिले आहे. नागरिक आता मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी ज्याप्रकारे आयुष्य जगत होते त्याचप्रकारे आता जगू शकणार आहेत. आता नागरिकांवर कोरोना नियमावलींचे (Corona Restrictions) काही गोष्टी अपवाद ठरता बंधन नसणार आहे. आजपासून (१ एप्रिल) आर्थिकदृष्ट्या नवीन वर्ष सुरू झाले आहे. याच नवीन वर्षांपासून सरकारने कोरोना नियमावली हटवण्यासह आणखी काही निर्णय घेतले आहेत.

कोरोना निर्बंधात दिलासा तर आयकर नियमांमध्ये होणार मोठे बदल:
एकीकडे गुढीपाडव्याचा मुहूर्त गाठून राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवून नागरिकांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आयकर (25 वी सुधारणा) नियम 2021 अंतर्गत 1 एप्रिलपासून आयकर नियमांमध्ये मोठे बदल देखील होणार आहेत.

वाचा: SRF Share | ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल, तब्बल 76 % टक्क्यांनी वाढली किंमत

Changes in Income Tax Department| आयकर नियमांमध्ये होणार मोठे बदल:

  • 1 एप्रिलपासून औषधांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ होणार. ज्यामध्ये पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह यांसारख्या शेड्यूल्ड औषधांचा समावेश आहे.
  • त्याचवेळी गृहिणींच्या बजेटला देखील याची झळ बसणार आहे. कारण इंधन दरवाढ तर सुरू आहेच पण आता एलपीजी गॅसची दरवाढ होणार आहे.
  • आता नवीन घर खरेदी करणाऱ्यांनाही याचा जोरदार दणका बसणार आहे. कलम 80EEA अंतर्गत आयकर कायद्याचा मिळणारा लाभ केंद्र सरकारने बंद केला आहे.

  • म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे रोखीने न देता येणार असून, त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी युपीआय अथवा नेटबँकिंगच्या वापराद्वारे देता येतील.
  • त्याचवेळी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (CCBIC) वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस करण्यासाठी मर्यादा 50 कोटी रुपयांवरून 20 कोटी रुपये केली.
  • याचा फटका आता वाहन खरेदी दारांना देखील बसणार आहे. निवडक कंपन्यांनी आजपासून वाहनांची देखील दरवाढ केली आहे. टाटा मोटर्सने 2 ते 2.5 टक्क्यांनी, तर टोयोटा 4 टक्क्यांनी आणि BMW किमती 3.5 टक्क्यांनी वाढणार आहेत. तसेच मर्सिडीज-बेंझ इंडियाही 3 टक्क्यांनी दरवाढ करू शकते.

  • कोरोना काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता विशेष एफडी योजना सुरू करण्यात आली होती. ज्यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक या बँकांचा समावेश होता. मात्र आता या योजना देखील बंद होऊ शकतात.
  • क्रिप्टोकरन्सीमधून व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA), क्रिप्टोकरन्सी विकून मिळालेल्या नफ्यावर देखील आता 30 टक्के कर लागणार.
  • विद्यमान पीएफ खाते दोन भागांत विभागले जाऊन त्यावर कर आकारणी होण्याची शक्यता आहे. ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात असून, कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये इतकी आहे.

वाचा: Cabinet Decision | मंत्रिमंडळात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय, बैलगाडी शर्यतीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

1 एप्रिलपासून महाराष्ट्रात होणारे बदल:

  • आजपासून सर्व कोरोना निर्बंध हटतील. त्याचवेळी सर्व जयंत्या आणि यात्रा, साजऱ्या करता येतील.
  • सरकारच्या नियमानुसार मास्क लावणे सक्तीचे नसेल, मात्र मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम नागरिकांना पाळावे लागेल.
  • सर्व धार्मिक स्थळे उद्योग-धंदा यावरही कोणतेही बंधन राहणार नाही.
  • त्यासह लग्न आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम सहली, चित्रपटगृहे सार्वजनिक ठिकाणे यावर आता संख्येची मर्यादा नसेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आण ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button