ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

मोठी बातमी, ‘ऊस भूषण पुरस्कार’ जाहीर; या शेतकऱ्यांनी पटकवले पहिले क्रमांक..

Big news, 'Us Bhushan Award' announced; The first number won by these farmers.

राज्याच्या साखर उद्योगाला (sugar industry) चालना मिळाली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (Vasantdada Sugar Institute) देण्यात येणारे यंदाचे ‘ऊस भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.

वाचा-

पहिला क्रमांक पटकवलेले मानकरी –

२०२०-२१ हंगामासाठी सातारा जिल्ह्यातल्या विमल धोंडिराम पवार यांना पूर्वहंगामी गटात, लातूर जिल्ह्यातल्या विश्वनाथ धोंडिबा होळसंबरे यांना सुरू गटामध्ये, तर सांगलीच्या सुलोचना मोहनराव कदम यांना खोडवा गटामध्ये पहिला क्रमांक पटकावल्यामुळे ते यंदाच्या ऊसभूषण पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत.

सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार –

तर राज्यातल्या सर्वोत्कृष्ट कारखान्याचा (One of the best factories in the state) पुरस्कार यंदा सांगलीच्या डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने प्राप्त केला आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत विजेत्यांची नावे घोषित केली.

वाचा –

प्रगतशील महिला शेतकरी –

राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कारांमध्ये पूर्वहंगामी गटात को ८६०३२ वाणाचे हेक्टरी ३२३.४५ टन उत्पादन घेणाऱ्या विमल पवार या साताऱ्याच्या वर्णे भागातील प्रगतिशील महिला शेतकरी (farmers) आहेत. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या त्या सभासद आहेत. पवार यांना दहा हजारांचा कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे.

लातूरच्या उदगीर भागातील गुडसूर गावचे शेतकरी विश्वनाथ होळसंबरे यांनी सुरू हंगामात व्हीएसआय ०८००५ वाणाचे हेक्टरी ३३०.६८ टन उत्पादन घेतले आहे. त्यांना दहा हजारांचा कै. वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला आहे. उदगीरच्या विलास सहकारी साखर कारखान्याचे (sugar industry) सभासद आहेत.

सांगलीच्या वाळवा भागातील कुंडलवाडीत को ८६०३२ वाणाचे खोडव्यात हेक्टरी २७७.०६ टन उत्पादन घेणाऱ्या महिला शेतकरी (farmers) सुलोचना कदम या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (sugar industry) सभासद आहेत. त्यांना दहा हजारांचा कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार मिळाला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button