ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Kharif Season | शेतकऱ्यांनो पाऊस लांबलाय ‘या’ तारखेपर्यंत पेरणीची घाई करू नका; कृषी विभाग

राज्यातील यंदाचा उन्हाळा हा संपण्याचं नावच घेत नाहीये. जून महिना संपायला आला मात्र, तरी देखील मान्सून (Monsoon) राज्यात दाखल झालेला नाही.

Kharif Season | त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या (Kharif season) पार्श्वभूमीवर पूर्व मशागतीची (Pre-cultivated) कामे आवरून मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच आता कृषी हवामान विभागातील तज्ञांनी (Department of Agriculture Expert) शेतकऱ्यांना पेरणीची (Sowing) घाई करू नका असा सल्ला दिला आहे. त्यामुळे, ऐन खरीप हंगामात (Kharif season) पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे.

पावसामुळे पेरणी लांबणीवर
जून महिना निम्मा गेला तरीही मान्सूनचे राज्यात आगमन झाले नाही. यामुळे यंदा मान्सून हा राज्यात उशिराच दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात खरिप हंगामासाठी यंदा 146.85 लाख हेक्टरवर खरीप पेरणी अपेक्षित आहे. मात्र, पाऊस लांबणीवर गेल्यामुळे हे नियोजन बिघडले असून पेरणी लांबणीवर गेली आहे.

वाचा: Weather | शेतकऱ्यांनो मान्सून अजुनही ‘इथेच’ अडकलाय, खरिपाच्या पेरणीची घाई करू नका कारण…

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वाहन
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 22 तारखेनंतरच पावसाचा अंदाज असल्याने जूनपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. त्यानंतर जुलै महिन्यात 6 तारखेनंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे 15 जुलैपर्यंत पेरण्या केल्या जाऊ शकतात. त्यामुळे 15 जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका, असे आवाहन शेतकऱ्यांना हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे. 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय जमिनीत ओलावा राहत नाही. अपुऱ्या ओलाव्यानंतर पेरणी केल्यास पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतर पीक तग धरून जोमाने वाढू शकते.

वाचा: Weather | महाराष्ट्रात कधी होणार मान्सूनचे आगमन? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

यंदा मान्सून राज्यात वेळेवर दाखल झाला नाही. त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे मान्सून गोव्याच्या किनारपट्टीवर येऊन थांबला आहे. तसेच, यंदाचा पाऊस हा समाधानकारक असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह ढगाळ आकाश निर्माण होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button