ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Milk Price Increase | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या सविस्तर

Milk Price Increase | शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. याच दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांची आर्थिक (Financial) स्थिती सुधारण्यास मदत होते. आता यात शेतकऱ्यांसाठी (Agriculture) आणि दूध उत्पादक उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता वारणा दूध संघाकडून गाईच्या दुधामध्ये वाढ (Milk rate) करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा: फक्त 4 दिवस बाकी मोदी सरकारच्या 6 हजारांसाठी तात्काळ करा ‘हे’ काम अन्यथा…

वारणा दूध संघाकडून दुधाच्या दरात वाढ
आता वारणा दूध संघाकडून गाईच्या दुधामध्ये 2 दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर वारणा दूध संघाकडून 1 सप्टेंबर पासून गायीच्या दुधात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ लागू करण्यात येणार आहे. 3.5 फॅटला आणि 8.5 एस. एन. एफ. ला आता प्रतीलिटर 32 रूपये दर मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फायदा होणार आहे.

वाचा: बाप रे! ‘या’ तीन पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, त्वरित जाणून घेऊन या पेयांचे सेवन थांबवा

दुधाच्या दरात का करण्यात आलीय वाढ?
खरं तर, सामान्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्रस्त केले आहे. शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची किंमती देखील मोठ्या संख्येने वाढल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना पशुखाद्य व महागाईमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. हीच आर्थिक झळ शेतकऱ्यांना लागू नये यासाठी दुधाच्या दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या सणाच्या पार्श्वभुमीवर ही दरवाढ करण्यात आल्यामुळे शेतकरी देखील समाधानी होणार आहे.अशी घोषणा वारणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Increase in milk price by 2 rupees know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button