ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

1930s Mini Ford Car | कौतुकास्पद; सांगलीच्या या मराठी माणसाने बनविली 1930 सालची ‘मिनी फोर्ड’ गाडी, या गाडीला होतेय प्रचंड मागणी..

1930s Mini Ford Car | Admirable; The 1930s 'Mini Ford' car made by this Marathi man from Sangli is in great demand.

1930s Mini Ford Car | सांगली शहरातल्या काकानगरमध्ये राहणाऱ्या अशोक आवटी यांनी 1930 सालची ‘मिनी फोर्ड’ गाडी तयार केली आहे. यांच्या या कल्पनेला आणि मेहनतीला सर्वांनी सॅल्युट केले आहे. गाडी पाहण्यासाठी प्रचंड माणसाची गर्दी होतेय.

अशोक आवटी यांनी तयार केलेली व यांच्या घरासमोर असलेली 1930 सालची ‘मिनी फोर्ड’ गाडी आता कोणाकडेच नाही. ही गाडी बनवताना M80 दुचाकीच इंजिन आणि भंगारातील साहित्य वापरून या गाडीला न्यू लूक तयार केला. ही गाडी फक्त 30 हजारांमध्ये बनविली.
सांगली शहरातील काकानगरमध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकी रिपेअरिंगचे अशोक आवटी यांचं लहान गॅरेज आहे.

वाचा –राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला सावध राहण्याचा इशारा..

युट्युबला पाहून बनविली गाडी –

2020 कोविडच्या लॉकडाऊनमध्ये अशोक आवटी हे युट्युबला गाड्यांचे विडिओ पाहायला लागले. दुचाकी इंजिनपासून लोकांनी चारचाकी गाडी बनविल्याचे विडिओ त्यांना पाहायला मिळाले. आपणही अशाप्रकारे गाडी तयार करू शकतो. ही आयडिया त्यांनी तयार मनात तयार केली

यांनी एमए-80 दुचाकी इंजिन तसेच रिक्षाचे पार्ट व भंगारातलं साहित्य या गाडीसाठी घेतले. सर्वात पहिल्यांदा गाडीचा ढाचा घेतला, यानंतर भंगारातून पत्रा व लोखंड गोळा केले. नंतर वेल्डिंग च्या साहाय्याने हुबेहूब फोर्ड गाडीप्रमाणे लूक दिला. चुका सुधारत पार्ट बदलत 2 वर्षात 1930 फोर्ड सारखी हुबेहुन गाडी बनविली. आजच्या जमान्यात लोकांना ही गाडी पाहायला मिळावी म्हणून बनविली असल्याचे सांगत आहेत. ही गाडी विकत घेण्यासाठी व अशीच गाडी बनविण्यासाठी लोक प्रचंड मागणी करत असल्याचे सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

या आठवड्यात तापमान वाढण्याची शक्यता; भारतीय कृषी संशोधन शास्त्रज्ञांनी दिला पिकांची काळजी घेण्याचा सल्ला…

झाडांवरील कीड, रोग नष्ट करा कायमची; त्वरित करा घरगुती हा उपाय…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button