lang="en-US"> Result | दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यात! ‘या’ तारखेला - मी E-शेतकरी

Result | दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यात! ‘या’ तारखेला बारावी आणि दहावीचा निकाल होणार जाहीर

Result | दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपून आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता आहे. बोर्डाने निकाल (Result) वेळेत जाहीर करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, बारावीचा निकाल २५ मे रोजी आणि दहावीचा निकाल ६ जून रोजी जाहीर होईल, अशी माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये पुरवणी परीक्षा

यंदा १७ लाख विद्यार्थी दहावी आणि १२ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. बारावीच्या ९९% आणि दहावीच्या ८५% उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाली आहे. दररोज उत्तरपत्रिका तपासणीचे मूल्यांकन केले जात आहे. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण गुणपत्रिकांवर नोंदवण्यात आले आहेत आणि आता तपासणी पूर्ण झालेल्या उत्तरपत्रिकांवरून गुणपत्रिका तयार होत आहेत.

वाचा: ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियमांमध्ये सुधारणा! आता चाचणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज संपली

एक महिन्यात बारावी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल

आता एका महिन्यात बारावीचा निकाल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल. गतवर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला होता. यंदाही त्याचवेळी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: अर्रर्र..! प्रोत्साहन अनुदानासाठी तब्बल 8.5 लाख शेतकरी अपात्र; या यादीत तुमचं नाव तर नाही ना?

बोर्डाच्या परीक्षेत भविष्यातील बदल

पुरवणी परीक्षेत उत्तीर्णांना नवीन वर्षात प्रवेश

दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ शकतील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version