तरुण संशोधकांची शेतकऱ्यांसाठी धडपड, शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उभारलं किफायशीर हवामान केंद्र..
Young Researchers Struggle for Farmers, Build an Affordable Weather Center
नाशिक : जिल्ह्यामध्ये नासाच्या सॅटॅलाइट (NASA satellite) च्या मदतीने शेती केली जाते यासाठी नासाचे माजी संशोधक डॉ. पराग नार्वेकर (Former NASA researcher Dr. Pollen Narvekar) किफायतशीर वेदर स्टेशनची (Of the weather station) निर्मिती केली आहे. नाशिक मध्ये डॉक्टर पराग यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहेत.
काही वर्षांपूर्वी शेतीचा अभ्यास करताना डॉक्टर पराग नार्वेकर यांच्या लक्षात आले हवामानात सातत्याने बदल होत आहेत, कधी प्रचंड पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतीवर प्रचंड परिणाम होत आहे. हवामान बदलाचा मोठा फटका सध्या शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय.
कित्येकदा नैसर्गिक संकटामुळे (Due to natural disasters) हातातील पीक हिरावले जात असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागते. या सर्वांचा विचार करून त्यांनी सह्याद्री फार्म च्या मदतीने वेदर स्टेशनची निर्मिती केली आहे.हवामानाची पूर्वसूचना शेतकऱ्यांना मिळण्यास होणारे नुकसान टाळले जावू शकते.
हे ही वाचा :नाशिक : यंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच…
नाशिक मध्ये सामान्य शेतकऱ्यांना (To farmers) परवडेल अशा किमतींमध्ये तीन वेदर स्टेशनची निर्मिती केली आहे, याची किंमत दहा हजार रुपये पासून ते 60 रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे या वेदर स्टेशनच्या माध्यमातून पाणी, माती, हवामान, पीक व्यवस्थापन, वाऱ्याचा वेग, दिशा, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक सूर्यकिरणे, बाष्पीभवन,(Evaporation) हवेचा दाब याची देखील माहिती मिळते.
त्यामुळेच सहाजिकच शेतकऱ्यांचे फायदा होऊन नुकसान टाळले जाऊ शकते अशी माहिती सह्याद्री फार्म्सचे कृषीतज्ज्ञ सचिन वाळुंज (Sachin Walunj, an agronomist of Sahyadri Farms) यांनी दिली.
हे ही वाचा
SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…
कृषीसेवा केंद्र कसे चालू कराल व त्या संबंधीच्या अटी व पात्रता वाचा सविस्तर माहिती..