Heart Disease| तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढीला! 18 वर्षांपासून हृदयविकाराशी संबंधित लिपिड प्रोफाइल चाचणी करा: कार्डिओलॉजिस्ट|
Heart Disease| मुंबई: गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण (quantity) वाढीस लागले आहे. पूर्वी उतारवयात होणारे हृदयरोग आता 18 ते 30 वयोगटातील तरुणांनाही त्रास देत आहेत. या गंभीर परिस्थितीला लक्षात घेऊन, कार्डिओलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) या संस्थेने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हृदयविकाराशी संबंधित लिपिड प्रोफाइल चाचणी 18 व्या वर्षीच करणे आवश्यक आहे. आता या चाचणीसाठी उपाशी राहण्याचीही गरज नाही.
भारतातील तरुणांमध्ये हृदयरोग का वाढतो?
सीएसआयचे म्हणणे आहे की भारतात काही वैशिष्ट्ये आहेत जी इतर देशांमध्ये आढळत नाहीत आणि त्यामुळे तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढण्यास हातभार लागतो. जसे की, भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात लिपिड आणि कमी HDL लेव्हल आढळून येतात.
वाचा:A Punishable Offence| नवीन कायद्यानुसार विवाहित महिलेला फसवणे हा गुन्हा आहे का|
लक्षणे काय आहेत?
बहुतेक लोकांना डिस्प्लेडिया झाला आहे हे लक्षातच यत नाही. काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- पायाला सूज येणे
- छातीत दुखणे
- श्वास घ्यायला त्रास होणे
- मान आणि पाठ दुखणे
- झोप न येणे
- थकवा जाणवणे
- अपचन (indigestion)
- चक्कर येणे
- घाबरल्यासारखे होणे
हृदयरोग टाळण्यासाठी काय करावे?
- व्यसनाधीनता टाळा
- लठ्ठपणा कमी करा
- मधुमेह नियंत्रित ठेवा
- तेलकट, तुपकट पदार्थ आणि प्रक्रिया केलेल पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा
- नियमित व्यायाम (Exercise) करा
- तणावमुक्त रहा
- धूम्रपान टाळा
- चांगल्या आहारसवयींचा अवलंब करा
- नियमितपणे आरोग्य तपासणी करा
डॉक्टरांचा सल्ला
“आधुनिक जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते दैनंदिन जीवनात उशिरापर्यत जागरण आणि विविध ताणतणाव ही काही प्रमुख कारणे हृदयाच्या आरोग्याला बाधा पोहोचवतात. गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्याची चाचणीसुद्धा आता लवकर करणे गरजेचे आहे” असे डॉ. अजय चौरासिया, हृदयरोग विभाग प्रमुख, नायर रुग्णालय यांचे म्हणणे आहे.