कृषी सल्ला

या LIC पॉलिसीतुन दरमहा मिळतील 20 हजार रुपये, एवढे पैसे जमा करावे लागतील..

You will get Rs. 20,000 per month from this LIC policy.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी (Insurance company) भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या विमा योजना (Insurance plan) ऑफर करते. ज्यामुळे ग्राहकांना चांगला फायदा तर मिळेलच, तसेच आणि बरेच बनिफीट्स देखील आहेत. LIC ची अशीच एक पॉलिसी (company) जीवन अक्षय आहे, ज्यामध्ये जर ग्राहकांनी एकरकमी पैसे जमा केले तर, त्यांना आजीवन पेन्शन मिळते. या पॉलिसी (policy) बद्दल सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

पॉलिसी काय?

ही एकल प्रीमियम (Single premium) नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपिंग (Non-linked non-participating) आणि वैयक्तिक वार्षिकी पॉलिसी (policy) आहे. यामध्ये किमान 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही 1 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला वार्षिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल. ३५ ते ८५ वयोगटातील लोक ही पॉलिसी (policy) घेऊ शकतात. कुटुंबातील कोणतेही दोन सदस्य संयुक्त वार्षिकी घेऊ शकतात.

वाचा –

20 हजार रुपयांच्या पेन्शनसाठी एवढी गुंतवणूक करावी लागेल –

LIC च्या जीवन अक्षय-VII पॉलिसीमध्ये (policy) एकूण 10 पर्याय असतील. एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला एका प्रीमियमवर महा 20 हजार रुपये पेन्शन (pension) मिळते. तुम्हाला ही पेन्शन (pension) दर महिन्याला हवी असेल, तर तुम्हाला दरमहा पेन्शनचा पर्याय निवडावा लागेल. गणनेनुसार, दरमहा 20 हजार 000 रुपये पेन्शन मिळविण्यासाठी, तुम्हाला एकावेळी 40 लाख 72 हजार रुपये गुंतवावे लागतील. ज्यामुळे तुमचे मासिक पेन्शन 20 हजार 967 रुपये असेल. तुम्हाला आवश्यक असलेल्या पेन्शनच्या (pension) रकमेनुसार दिलेल्या पर्यायांमधून रक्कम निवडा आणि त्या आधारावर तुम्हाला गुंतवायची असलेली रक्कम गुंतवा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button