कृषी सल्ला

पपई लागवडीतून काढू शकाल अधिक उत्पन्न; लागवड करताना फक्त “हि” काळजी घ्या…

भारतात पपई लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकर्यांना या पिकामध्ये तसेच उत्पन्न देखील मिळते. चांगले उत्पन्न काढायचे असेल तर पपई पिकाची काळजीही तशीच घ्यावी लागते. या फळांवर रोगराईचा प्रादुर्भाव अतिप्रमाणात दिसू लागतो. याचे नियंत्रण कसे करायचे याविषयी सविस्तर माहिती घेवूया…

वाचा –

पपई लागवड केल्यानंतर खोड पोखरणाऱ्या आळीचा धोका निर्माण होतो. रोगराईचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाल्यास पपईचे खोड हे मुळातूनच वाळण्यास सुरुवात होते.

रोगाची लक्षणे अशी ओळखा –

पपईमध्ये बोरनची कमतरता असते. या कमतरतेमुळे पानांची गळती होण्यास सुरुवात होते. पानेही पिवळी पडतात. यामुळे फळे वाढण्यास कमतरता जाणवते व फळांची वाढ कमी प्रमाणात होते. तसेच फळ वाढीस सुरुवात झाल्यावर पांढरे डाग निर्माण होतात व यामुळे सुद्धा फळाची वाढ खुटते. त्यामुळे लागवड करतानाच योग्य काळजी घ्यावी लागते.

वाचा –

बोरनचे व्यवस्थापन –

लागवड करण्याआधी माती परीक्षण करा. बोरनचे प्रमाण निश्चित होईल. माती परीक्षण शक्य नसेल तर ८ ते १० ग्रम बेसल डोस द्या. हि प्रक्रिया फळ लागवडीसाठी जमीन नांगरतानाही करता येते. बोरन ६ गरम प्रती लिटर पाण्यात पहिल्या महिन्यापासून ८ व्या महिन्यापर्यंत एका महिन्याच्या फरकाने फवारणी करा. फळावरील रोगराई नाहीशी होईल व उत्पादन चांगले निघेल. अशा प्रकारे प्रक्रिया केली तर रागराईपासून सुटका मिळेल. व चांगले उत्पादन घेवू शकाल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button