ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

‘या’ सरकारी योजनेद्वारे तुम्ही कमवू शकता लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती…

You can earn millions of rupees through this government scheme, find out the details


पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत (Prime Minister’s Kusum Yojana) सौर पॅनल बसवून आपण लाख रुपयांची कमाई करू शकता, सौर पॅनल बसवणे करिता सरकार देखील प्रोत्साहन देत असते, पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही घरावरील शेतावर किंवा मोकळ्या जागेत सौर पॅनल (Solar panel) बसवून वीज निर्मिती (Power generation) तयार करू शकता, त्यातून तुम्हाला लाख रुपये मिळू शकतील.

शेतकरी किंवा समाजातील आर्थिक दुर्बल घटक यांना इच्छा असूनही सौर पॅनल असू शकत नाही परंतु पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सरकार मोठे अनुदान प्रदान करते. या योजनेअंतर्गत शेतकरी आपली शेतजमीन खासगी कंपन्यांना भाड्याने देऊन किंवा सौर पॅनेल बसवून आणि त्यातून मिळणारी वीज विकून नफा मिळवू शकतात.

कसा मिळेल फायदा? (How to get the benefit)

  • सौर पॅनल बसवण्यासाठी आपल्या जमिनीचा एक तृतीयांश भाग भाड्याने देऊ शकतो, सर्वसाधारणपणे एक एकरसाठी आपणास एक ते चार लाख रुपये पर्यंत दराने भाडे मिळू शकते.
  • यासाठी आपण भाडेकरार करू शकतो,शक्यतो भाडेकरार पंचवीस वर्षासाठी ठेवला जातो.
  • सौर पॅनल बसवण्यासाठी सर्व खर्च खाजगी कंपनी करू शकते, यासाठी आपणास एक रुपये खर्च करावा लागणार नाही. तसेच आपणास सौर पॅनल खरेदी करायचा असल्यास, सरकार सूट देऊ शकते.
  • ज्या शेतकऱ्यांनी सौर पॅनल साठी आपली जमीन भाडे तत्त्वावर दिली आहे त्या शेतकऱ्यांना 1000 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा (Power supply) देखील मिळू शकतो.

वाचा : या ॲप्लिकेशन वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल पाऊस अगोदर सुचना आणि कृषी सल्ला… पहा कोणते हे ॲप्लिकेशन आहे.

यासाठी काय करावे लागेल? (What needs to be done for this?)

शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना जमीन भाडेतत्वावर द्यायची नाही, ती शेतकरी स्वतः सोलर पॅनल लावून वीज निर्मिती करू शकतात पैसे कमवू शकतात. परंतु ज्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर (On a rental basis) जमीन द्यायचे आहे, त्या शेतकऱ्यांनी वीज विक्रीसाठी खासगी आणि सरकारी कंपन्यांशी संपर्क साधा. एक मेगावॅट सौर प्रकल्प उभारण्यासाठी सहा एकर जागेची आवश्यकता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button