इतर

आधारकार्ड वरील नाव व जन्मतारीख बदलू शकता आता मोबाईलवर; पहा प्रोसेस काय आहेत?

You can change the name and date of birth on Aadhaar card now on mobile; See What are the processes?

आधारकार्ड (Aadhaar card) मध्ये आता सहज नाव आणि जन्मतारीख बदलू शकतो. हे काम तुम्ही मोबाईलवरुनही करु शकता. ‘आधार मदत केंद्र’ (Aadhaar Help Center) नुसार, यासाठी तुम्हाला ssup.uidai.gov.in/ssup/ वर लॉगिन करावे लागेल. या ऑनलाईन पत्त्यावर भेट दिल्यानंतर नाव आणि जन्मतारीख सहज बदलता येते. लॉग इन केल्यावर आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर हवी असलेली सेवा निवडा. या सेवेनुसार, आवश्यक कागदपत्रे विचारली जातात ती स्कॅन करून अपलोड करा. या प्रोसेस नंतर फक्त 50 रुपये शुल्क भरावा लागेल.

वाचा : पीकविमा प्रकरण लोकसभेत: खडसे यांची “या” जिल्ह्यातील विमा साठी धावपळ; पहा विडिओ बँक कडून चूक झाल्यावर काय व कधी मिळणार पीकविमा?

काय आहे नियम?

5 ते 90 सुधारणासाठी आधारने दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. जन्मतारीख मध्ये फक्त एकदाच अपडेट करू शकतो. काही अपवादांमध्ये, जन्मतारीख एकापेक्षा जास्त वेळा बदलली जाऊ शकते परंतु त्यासाठी स्वतंत्र हाताळणी प्रक्रिया निर्धारित केली आहे. यासाठी आधार केंद्रामध्येच जाणं गरजेचे आहे.

सेल्फ डिक्लेरेशन देणे आवश्यक –

जन्मतारीख बदलली गेली, तर जन्मतारखेशी संबंधित दस्तऐवज, एक स्व-घोषणा ज्यामध्ये असे लिहावे लागेल की आपण स्वतः जन्मतारखेमध्ये सुधारणा करत आहे. त्याचप्रमाणे, मोबाईल किंवा ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी, आधार धारकालाही आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.

वाचा : कमी पाण्यात उत्तम उत्पन्न देणारी मिल्क थिसल ही औषधी वनस्पती माहीत आहे का? भारतातून या औषधी निर्यात हि शक्य…

मोबाईल नंबर ऑनलाईन दुरुस्त करू शकत नाही

मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट (Online updates) करण्याची सुविधा उपलब्ध नाही. जर एखादी व्यक्ती मोबाईल क्रमांक पडताळणीशिवाय ऑनलाईन बदलू शकत असेल, तर त्यामुळे पुढे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. बँक खाते, ऑनलाईन केवायसी पडताळणी इत्यादींचे काम मोबाईल क्रमांकाशीच जोडलेले आहे. मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा आधार केंद्रातच जावे लागणार.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button