योजना

Yojana | आनंदाची बातमी! मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते 8 लाख 14 हजार महिलांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा; तुम्हाला मिळाले का?

Good news! 5 thousand rupees deposited in the accounts of 8 lakh 14 thousand women by Chief Minister Shinde; did you getGood news! 5 thousand rupees deposited in the accounts of 8 lakh 14 thousand women by Chief Minister Shinde; did you get

Yojana | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज राज्यातील 8 लाख 14 हजार महिलांना पीएम मातृ वंदना योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थीला ₹5,000 चे अनुदान दिले जाते. या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिला ही मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही सांगितले.

वाचा : Marrying a woman | मोठी बातमी ! ओळख लपवून लग्न केलं तर आता गुन्हा! 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते वाचा सविस्तर …

नमो 11 कलमी कार्यक्रम
या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने केलेल्या योजनांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राबवित असून 1 एप्रिल 2023 नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे. या कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाच्यावतीने महिलांसाठी विविध योजनांचे पोस्टर्सही प्रकाशित करण्यात आले.

हेही वाचा :

Web Title:Good news! 5 thousand rupees deposited in the accounts of 8 lakh 14 thousand women by Chief Minister Shinde; did you get

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button