Yogesh Waghmode | जामखेडच्या योगेश वाघमोडेला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी, राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेसाठी निवड
Yogesh Waghmode | नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेत जामखेडचा योगेश वाघमोडे (Yogesh Waghmode) याने सुवर्णपदक पटकावून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयामुळे त्याची राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
योगेश वाघमोडे ल.ना.होशिंग ज्युनियर कॉलेज, जामखेड येथे शिकत असून, नवीन मराठी शाळा, जामखेड येथे वुशूचा सराव करतो. त्याला जिल्हा वुशू संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले आणि प्रशिक्षक शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभते.
या उल्लेखनीय यशावर जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सचिव एस एस कटके, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित दादा पवार, आमदार प्रा. राम शिंदे, मा.जि.प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश देशमुख, प्राचार्य श्रीकांत होशिंग, क्रीडा शिक्षक प्रल्हाद साळुंके, धीरज पाटील, राघवेंद्र धनलगडे, शाम पंडित, रोहित थोरात यांच्यासह अनेकांनी योगेशचे अभिनंदन केले आहे. योगेशच्या या यशाने संपूर्ण जामखेड तालुक्यात उत्साह निर्माण झाला आहे. सर्वजण त्याला राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा:
• दिवाळीपूर्वी ‘या’ राशींवर देवी लक्ष्मीचा राहणार विशेष आशीर्वाद, वाचा 12 राशींची साप्ताहिक पत्रिका
• धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, रोजचे राशीभविष्य वाचा