कृषी बातम्या

“या” शेतकऱ्याने पिकविली खजुराची शेती; आता लाखोंमध्ये घेतोय उत्पन्न, खजूर शेती करायची असेल तर पहाच..

खजूर लागवड प्रामुख्याने वाळवंटी प्रदेशात केली जाते. माळेगाव खुर्द येथे राहणाऱ्या प्रशांत प्रतापराव काटे या शेतकऱ्याने बारामतीच्या मातीत खजूर लागवड करून उत्पन्न काढून दाखविले. या शेतीतून लाखोंमध्ये उत्पन्न काढत आहेत..

वाचा –

अशी घेतली माहिती –

गुजरातच्या वलसाड येथून त्यांना खजूर लागवडीची माहिती मिळाली. या पिकासाठी आवश्यक वातावरण आणि होणाऱ्या खर्चाचा त्यांनी अभ्यास केला. लागवडीनंतर खजूर शेतीस खर्च कमी असल्याने पावणेदोन एकरात खजुराच्या रोपांची लागवड केली. लागवडीसाठी त्यांना सहा लाख रुपये खर्च आला. एक रोप साडेतीन हजार रुपयांनुसार त्यांनी गुजरातमधून २०१७ मध्ये ११३ रोपे मागवली होती. आता या झाडांना ४ वर्ष झाले आहेत.

वाचा –

खजूर वाढ व उत्पादन –

खजुराला रोपे लागवाडीपासून चार वर्षांत फळे येणे सुरू होते. एका झाडाला पहिल्या वर्षाला वीस किलोपर्यंत फळे येतात. पुढे त्यात वाढ होऊन १०० ते १५० किलोपर्यंत फळे येतात. ८० ते ९० वर्ष फळे देतात. खजूर १०० ते २०० किलो दराने विकले जातात. व्यावसायिक पद्धतीने शेती केली तर उत्पन्न दुप्पटीने मिळेल. शेतकऱ्यानी आता पारंपरिक शेतीत न राहता आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती फायद्याची ठरू शकते.

वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button