ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

‘महिला बचत गटांना’मिळणार दोन लाख रुपये कर्ज! कसा कराल अर्ज, जाणून घ्या; सविस्तर माहिती…

'Women's self help groups' to get Rs 2 lakh loan! Learn how to apply; Details

केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार (State Government) शेतकरी व महिला बचत गटांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असते, यासाठी अनेक योजना ही राबवत असते, महिला सक्षमीकरण (Women empowerment) करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे.
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत (Through Maulana Azad Minority Economic Development Corporation) राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना (Women’s self-help groups) व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज (Loan up to Rs. 2 lakhs) देण्यात येणार आहे.

हेही वाचा : ‘कांदाचे उत्पादन’ क्षमता वाढवण्यासाठी,’केंद्र सरकारची ठोस पाऊले’ वाचा सविस्तर बातमी…

[metaslider id=4085 cssclass=””]

विकासमंत्री नवाब मलिक (Development Minister Nawab Malik) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेद्वारे महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याकरता पहिल्या टप्प्यात 750 बचत गटांना कर्ज देण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. चला तर जाणून घेऊ या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

योजनेविषयी संपूर्ण माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. किंवा या योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास, आपणमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, माविम, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या संस्थांचे मुख्यालय किंवा जिल्हा, तालुका कार्यालयाशी चौकशी करू शकता.

या योजनेस सहभागी होण्याकरिता अर्जाची अंतिम तारीख २० जुलै इतकी आहे. तरी महिला बचत गटांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.

हेही वाचा : SBI Bank : एसबीआय बँकेकडून, ‘पंतप्रधान जन धन खातेदारांना ‘ मिळणार ‘ही’ विशेष सुविधा…

योग्यता / पात्रता:(Eligibility)

बचत गटातील ७०% सभासद अल्पसंख्यांक समाजातील असावेत.

बचतगटातील सर्व सभासद महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.

बचतगटातील अध्यक्ष व सचिव साक्षर असावेत.
वय-बचतगटातील सर्व सभासदांचे वय १८ वर्ष पेक्षा जास्त असावे.

बचतगटातील प्रतेक सभासदाचे वार्षिक उतपन्न –
शहरी भागासाठी – रु 1,03,000/- पेक्षा कमी
ग्रामीण भागासाठी – रु 81,000/- पेजा कमी.

हेही वाचा :

पावसाळ्यामध्ये, ‘हे’ ॲप्लिकेशन शेतकऱ्यांना देईल मोलाची साथ! वाचा इतर फायदे

ह्या’ आयुर्वेदिक पिकांची लागवड करा आणि मिळावा भरगोस उत्पन्न…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button