कृषी सल्ला
ट्रेंडिंग

महिलांचा शेतीतील सहभाग…

ती कुंठुबच नव्हे तर मातीतुन सोनही फूलवते. कुंठुबातही एक स्रीच जन्मलेल्या बाळाचे संगोपन करते, अगदी त्याचप्रमाणे मातीमधुन पिक सोन्यासारख फूलवते. शेती हा व्यवसाय पुरूषांचा मानला जातो. परंतू महिलांची देखील शेतीमधील भागिदारी कमी नाही पेरणी पासुन ते काढणी पर्यत ते पिकांची देखरेख सर्व कामे महिला पुरूषांच्या खांदयाला खांदा लावुन काम करतात जवळपास 85% गृामीण महीला शेतीमध्ये कष्ट करतात.तर 60% महीला अन्न आणी 90% महीला दूग्धजन्य पदार्थ तयार करतात. तसेच 60% सेवाक्षेत्रातील योगदान हे महीलांचे आहे.तसेच मधूमक्षीका पालन,आळंबी,जैविक शेती असेच अनेक क्षेत्रात महीला शेतकरी अग्रेसर आहे.

पंरतु आजच्या जागतीक महिला दिना दिवशी मनाला पडणरा प्रश्न “अाईना पुछे महीला से तेरी सूरत कहां है” ह्या वाक्याप्रमाणे साध्याची स्थिती आहे. ग्रामिण महिला कुठे गायब? त्याचे अस्तित्व काय? त्यांच्या नावावर सातबारा, त्यांचा जमीनी वर हक्क फक्त 13% महीलांच्या नावे जमीन आहे. जास्त कष्ट पंरतु संसाधनावर महिलांचा हक्क नाही. ह्याची कारणे वेगवेगळी अाहेत.

1) पुरुषसत्ताक समाज, ह्या कारणामूळे, महीला शेतकरी असा दर्जाच त्याना मिळत नाही.

2) कमी मजूरी, पूरूषाइतकेत काम करुनही मजुरी मात्र कमीच मिळते म्हणून त्यांचे हक्क त्यांना बजवता येत नाही.

3)अशिक्षीत,ग्रामीण महीलां चे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, त्यामूळेच कमी जागरूकता दिसुन येते. 2% महीलाना त्यांचे हक्क माहित आहेत. केंद्र सरकार च्या योजना त्याच्यापर्यत गेल्या पाहिजेत.
स्त्रियांच्या या प्रश्नांवर उपाय काय आहेत. केंद्र सरकार ची महीला सशक्तीकरण परी योजना, अशाप्रकारच्या योजना अाणल्या पाहीजेत,

2) 2011 मध्ये एम.एस स्वामिनाथन यांनी एक बिल पास केल होत Women Farmer Entitlement Bill जे सध्या नाहीये.

3) Women Market Accssibility
शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, अवजारे आणण्यासाठी पूरुषच मार्कट मध्ये जातात, पंरतु तिथे शेतकरी महीलांचा सहभाग दिसत नाही. ही गोष्ट बदलण्यासाठी सरकार ने योजनाआणल्या आहेत . शेतकरी महीलाना कमीतकमी व्याजदर द्यावा ,विशिष्ट सवलती दिल्या पाहिजेत. जेणेकरुण ग्रामिण भागात शेतीचे महिलाकरण होईल, जसे की Integrated Scheme for Agri Marketing ह्या योजनेमध्ये 33% Subsidy for Women and 25% for Man आश्याप्रकरच्या योजनांमुळे महीलाचा शेतकरी सहभाग आणखी वाढेल जर महीलांचा शेतीवर हक्क असेल तर घरगूती हिंसाचार पण कमी होण्यास मदत होईल.

कु. बहिर राणी
सौ के. एस. के. कृषी महाविद्यालय, बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button