दिनंदीन बातम्या
Buying a house| महिलांसाठी घर खरेदी झाली स्वस्त! केंद्र सरकारने स्टॅम्प ड्युटीमध्ये केली कपात|
Buying a house| मुंबई, 24 जुलै 2024: स्वतःचं घर बांधण्याचं/खरेदी करण्याचं स्वप्न आता सोपं झालं आहे! महिलांसाठी एक आनंदाची बातमी! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या बजटमध्ये महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास रजिस्ट्रीच्या वेळी आकारल्या जाणाऱ्या स्टॅम्प ड्युटीमध्ये घट करण्याचा (decision) निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा देशातील लाखो महिलांना फायदा होणार आह आणि महिला सशक्तीकरणाला चालना मिळणार आहे.
केंद्र सरकारने राज्यांना काय सूचना दिल्या?
- महिलांच्या नावावर खरेदी केलेल्या घरांसाठी स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.
- स्टँप ड्युटीचे दर सर्वांसाठीच कमी करण्याचं केंद्र सरकार राज्यांना सांगत आहे.
- महिलांच्या नावावर खरेदी करण्यात आलेल्या प्रॉपर्टीवर कमी स्टँप ड्युटी आकारण्यासाठी विचार करण्याबद्दल प्रोत्साहन (encourage) दिलं जात आहे.
या निर्णयाचे काय फायदे आहेत?
- महिलांना घर खरेदी करणं अधिक परवडणारं होई.
- महिला सशक्तीकरणाला चालना मिळेल.
- महिलांच्या नावावर घर खरेदी केलं जात असेल, तर स्टॅम्प ड्युटी कमी आकारण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. या व्यतिरिक्त केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये घराच्या संदर्भात (In context) आणखीही अनेक घोषणा केल्या आहेत.
वाचा: Benefits| केळीच्या सालीचे त्वचेसाठी अद्भुत फायदे|
पीएम आवास योजना
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गावं आणि शहरांमध्ये तीन कोटी घरं बांधली जातील.
- आगामी पाच वर्षांमध्ये शहरी घरांसाठी 2.2 लाख कोटी रुपयांच्या केद्रीय साह्याचा प्रस्ताव.
रेंटल हाउसिंग योजना
- शहरांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वस्त भाड्यात घरं मिळतील यासाठी रेंटल हाउसिंग योजना राबवली (Implemented) जाईल
- या हाउसिंग स्कीम्स मोठ्या कंपन्या आणि कारखान्यांच्या जवळपास उभारल्या जातील.
- या हाउसिंग स्कीम पीपीपी तत्त्वावर उभारल्या जातील.