दौंड मधील महिलांनी लढवली शक्कल! गोवऱ्या विकल्या थेट ऑनलाईनच; वाचा व ऐका त्यांच्या यशाची गाथा…
Women from Daund fought hard! Govarya sold directly online; Read and listen to their success story
पूर्वीच्या काळी घरोघरी गोवऱ्या (Cow dug cake) केल्या जात असत. गोवर्यांच्या मोठ्या मोठ्या गंजी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केल्या जात असत, परंतु पूर्वी इतक्या गोवऱ्या आत्ता दिसत नाही.
परंतु पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांनगाव येथील महिला बचत गटाने (Women’s self-help group)जुने ते सोने या तत्वानुसार गोवरी तयार करून चक्क अमेझॉन वर ऑनलाईन विक्री (Online sales) करण्यास सुरुवात केली. या प्रयत्नात त्यांना यश आले असून पुणे मुंबई तसेच तेलंगणा मधून त्यांच्या गोऱ्यांना भरपूर प्रमाणात मागणी आली आहे.
आधुनिकतेची धरली कास (Modernity has taken hold)
आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत या बचत गटातील महिलांनी अमेझॉन(Amazon)वर गाई-म्हशींच्या शेणाच्या गौऱ्या विकण्यास सुरुवात केली. सर्वात जास्त तेलंगणा मधून गवळ्याची मागणीदेखील त्यांना आली आता महाराष्ट्रातील थेट गौऱ्या तेलंगणामध्ये गेल्या.
परराज्यात वाढली मागणी (Increased demand in foreign countries)
दौंड मध्ये असले शेलार यांच्या पुढाकाराने पाच वर्षांपूर्वी महिला बचत गटाची स्थापना झाली होती गट जेमतेम चालला जात होता, शेलार व महिलांनी गोरे बनवण्याचा व्यवसाय करायचे ठरवले त्यांनी थेट ॲमेझॉन वर त्यांच्या व्यवसायाची नोंद केली त्यांची एक गौवरी 15 रुपये या भावाने जाते.
हेही वाचा: कृषी संबंधित बियाणे, खते, कीटकनाशके कृषी साहित्यांचा अडथळा दूर करणे बाबत आला सरकारचा नवीन जीआर…
गाईच्या शेणाची उपयुक्तता (Usefulness of cow dung:)
गाईच्या शेणामध्ये गंधक ,सोडियम ,मॅग्नेशियम ,झिंग फॉस्फरस, नाइट्रोजन यासारखा तत्त्वांनी परिपूर्ण आहे याचे केवळ खत उपयुक्त असला तरीही त्यामध्ये औषधी गुणधर्म देखील असतात.
या प्रयत्नांना त्यांना यश मिळून मोठ्या मोठ्या जिल्ह्यातून तसेच शहरांमधून त्यांच्या गोवऱ्या मागणी वाढली आहे. तसेच त्या गोवऱ्याची परराज्यात देखील मागणी वाढली आहे. आता दौंड तालुक्यातील नांनगाव येथील गोवरी ला पुणे, मुंबई,दिल्ली मागणी असून आधुनिकतेची कास धरून या महिलांनी स्वतःची प्रगती साधली आहे.
२) जमिनीची शासकीय मोजणी कशी कराल जाणून घ्या सर्व सविस्तर माहिती