चोवीस तासाच्या आत सरकारने व्याजदर संदर्भात घेतलेला ‘तो’ महत्त्वाचा निर्णय केला रद्द; सर्वसामान्य आणि शेतकरी ला दिलासा….
Within 24 hours, the government took this important decision and now there is no reduction in Kisan Vikas Patra interest rate.
31 मार्च म्हणजेच आर्थिकवर्षाच्या अखेरीस मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक धक्का दिला होता. अल्पबचत व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे सर्वसामान्य जनता चिंतीत होती.
मात्र हा निर्णय सरकारला 24 तासाच्या आत मध्ये बदलावा लागलेला आहे. अल्पबचत व्याजदर हा नजरचुकीने घेतलेला निर्णय असल्याचे जाहीर करत निर्मला सीतारमण यांनी अल्पबचत व्याजदराचा निर्णय मागे घेतल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता चिंता करण्याचे कारण नाही.
ज्यांनी सरकारी अल्पबचत स्कीम मध्ये गुंतवणूक केले आहे त्यांना काळजी करण्याचे कारण नाही. 2020-21 मधील व्याजदर जसे होते तसे राहणार आहेत. हा निर्णय नजरचुकीने निघाला असल्याचं म्हणत निर्णय मागे घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.
या निर्णयाचा सर्वसामान्य याचा परिणाम दुरगामी पडणार होता. बचत खाते, पीपीएफ, टर्म डिपॉसिट, आरडी ते वयस्कर लोकांसाठीच्या असलेल्या बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये सरकारने भरभक्कम अशी कपात केली होती. परंतु सरकारने हा निर्णय बदलून सर्वसामान्य जनतेला एक सुखद धक्का दिला आहे.