कृषी तंत्रज्ञान
आता होणार कोंबडी शीवाय पिल्ले तयार? काय आहे ‘विनाकोंबडी अंडी उबवणी यंत्र; पहा सविस्तर…
नाशिक/भऊर (ता. देवळा) येथील विनोद पवार या युवकाने कोंबडीशिवाय पिल्ले तयार करण्याची किमया साधली आहे.
विनोदने अनोखे ‘विनाकोंबडी अंडी उबवणी’ यंत्र बनविले आहे, यात कोंबडी अंड्यावर न बसविता कृत्रिम ऊब निर्माण करत त्यातून पिल्लांना जन्म देणारे अत्यल्प खर्चातील यंत्र विनोदने बनविले आहे.
चारच्या पटीत अंडी ठेवता येतील असा ट्रे बनवत आणि काही विशिष्ट अंतरावरून त्याला बल्बची ऊब देत अंडी उबविण्याचे तंत्र विनोदने शोधले आहे.
यामुळे एकाच वेळी अनेक अंडी उबवून पिले तयार करता येत असल्याने पिल्ले विक्री करणे सहज शक्य होत आहे.
WEB TITLE: Will there be chickens without chickens now? What is’ chicken hatchery; See details …