राज्यामध्ये आज लॉकडाऊन लागण्याची शक्यता शेतमाल शेतातच पडून राहणार का?
Will there be a possibility of lockdown in the state today?
राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोणा ही दुसरी लाट वेगाने वाढत चालली आहे, त्यामध्ये मृत्यू दर देखील वाढत आहे तसेच ऑक्सिजनचे प्रमाण देखील लागत असल्याने ऑक्सिजन कमी पडत आहे, बाकीच्या सोयीसुविधा देखील यांच्यावर देखील ताण पडत आहे.त्यामुळे कोरोणाचे या लाटेला वेळेस थांबवण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करणार असल्याचे संकेत आले आहेत.
लॉकडाऊन मध्ये कोणत्या गोष्टी सुरू राहतील व कोणत्या गोष्टी बंद राहतील याबाबतीत संभ्रम आहे. शेतकऱ्यांना सुद्धा हीच चिंता सतावत आहे. शेतामध्ये आपला शेतमाल असाच पडून राहणार का असा सवाल त्यांच्या मनात आहे. परंतु कृषी मंत्री दादा भुसे यांनी मोठी माहिती दिली त्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असे सांगितले.
याबाबत दादा भुसे बोलताना यांनी लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही दिली.मागील लोक डाऊन मध्ये शेतीसंबंधी दुकाने शेतमाल बाजारात येण्याच्या दृष्टीने सर्व बाबींना लॉक डाऊन मध्ये सूट मिळाली होती या वेळीही तसंच होईल असे दादा भुसे म्हणाले.
शेतमाल थेट ग्राहकापर्यंत पोचणे भर देण्यात येईल असेही ते म्हणाले त्यासाठी जिल्हा पातळीवर खास कक्ष उभारण्यात येणार आहे.मागील देशव्यापी लॉकडाऊन मध्ये कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला तारले होते अजूनही कोणाला अन्नधान्य कमी पडले नाही यामागे शेतकऱ्यांचे श्रेय आहे ,यावेळी तुम्हाला शेतमालमध्ये वाढ दिसेल.
राज्यातील कोरोनाची संख्या लक्षात घेता सरकारने पंधरा दिवसाचा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे,परंतु त्याची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे.
हे ही वाचा
१) कृषी सिंचन योजनेचा फायदा मिळवण्यासाठी काय कराल??
२) ह्या आहेत फिक्स डिपॉझिट पेक्षा उत्तम परतावा मिळवून देणाऱ्या योजना, गुंतवणूक करा आणि भरघोस परतावा मिळवा.