कृषी सल्ला

कलिंगडच्या बियांचा उपयोग, घरातील व इमारतीच्या भेजा बुजवण्यासाठी “प्री मिक्सरला पर्याय ठरणार का?

Will the use of watermelon seeds be a substitute for pre-mixer for watering the house and building?

काही वेळेस किती चांगले बांधकाम (Construction) केले तरीही घराच्या इमारतीच्या भागांना भेगा पडतात, तसेच सततच्या पावसामुळे देखील जुन्या जीर्ण झालेले इमारतींना देखील भेगा पडतात, या भेगा कायमस्वरूपी मिटल्या तर किती बरे होईल? नागपूरच्या VNIT च्या सिव्हिल इंजीनियरिंग (Civil Engineering) विभागाने आगळं वेगळं संशोधन करत चक्क कलिंगडाच्या बियांचा उपयोग करत भेगा आणि छिद्र यावर उपाय काढला आहे.

कलिंगडाच्या बियांचा उपयोग करून कलिंगडाच्या बियांमधील “युरिएस”(Urias) बांधकामासाठी अधिक मजबूत करू शकतो असे त्यांनी संशोधन केले आहे, याकरता त्यांनी कलिंगडाच्या बियाणे सोबत कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि युरियाचं (Of calcium hydroxide and urea) एका विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून पेस्ट बनवून ती पेस्ट बांधकामातील, इमारतीतील भेगांमध्ये किंवा छिद्रांमध्ये इंजेक्ट (Injected) केल्यावर 28 दिवसानंतर ती भेग किंवा छिद्र कायमस्वरूपी बुजतात, असे संशोधन (Research) केले आहे.

तसेच या पेस्टने बांधकाम रुंदवत नाही त्याचप्रमाणे भविष्यात होणारे धोकाही टळतो. चाचण्यांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला असून याबाबत पेटंट देखील मिळवले गेले आहे. लवकरच संशोधक या पेस्टचा वापर प्रत्यक्ष बांधकामात करून “फिल्ड व्हॅलिडेशन स्टडी” (Field Validation Study) करणार आहेत.

भविष्यात अशी पेस्ट खूप उपयुक्त ठरणारी आहे, बाजारातील महागडे केमिकलयुक्त “प्री मिक्सर” ला (To expensive chemical “pre mixer”) पर्याय बनणार आहे.

हे ही वाचा :

बांबूची लागवड करा आणि मिळवा प्रतिमहा साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न !

सावधान! द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button