कृषी बातम्या

पाकिस्तानी स्वस्त कांदा बाजारपेठे, भारतीय कांदा उत्पादक अडचणीत येणार का?

Will Pakistani cheap onion markets, Indian onion growers get in trouble?

पाकिस्तानी स्वस्त कांदा (Cheap onion) बाजारपेठ मध्ये आल्याने बाजारभावात (market prices) घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बांगलादेश सीमा बंद करण्यात आल्याने आपल्याकडून बांग्लादेशात जाणार कांदा (Onion) कमी झाला आहे. तर पाकिस्तानचा कांदा स्वस्त असल्याने त्या कांद्याला दुबईत मागणी वाढली असल्याने दुबईला होणारी कांदा निर्यात कमी (Exports decreased) झाली आहे.

याशिवाय कोरोनाचा (Corona) फटका देखील कांदाला बसला आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाकडे माल पडून असल्यामुळे मागणी कमी आहे. भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (In the international market) टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतवारीचा आणि कमी दरामध्ये पाकिस्तानचा कांदा उपलब्ध झाला आहे. परंतु शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा.

आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव (Lasalgaon) कृषी उत्पन्न बाजार समितीत जून महिन्यात कांद्याची 11 लाख 70 हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली होती. त्यामुळे बाजारपेठेत अवघ्या 27 दिवसांत तब्बल 180 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये.

हेही वाचा :

1. ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा.

2. भरघोस उत्पादन देणाऱ्या लसुणाचे नव्या वाणाची झाली निर्मिती! मिळणार कमी दिवसात अधिक उत्पादन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button