ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानामुळे शिंदे गटात खळबळ

Devendra Fadnavis Will Devendra Fadnavis be the Chief Minister again? Chandrasekhar Bawankule's statement caused excitement in the Shinde group

Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? याची चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी 2024 ला फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं विधान केलं आहे. या विधानामुळे शिंदे गटाची धडधड वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी इथं भाजपकडून दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना बावनकुळेंनी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सुतोवाच केलं.

“देवेंद्र फडणवीस हेच एकमेव वाघ आहेत, त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही वाघ राज्यात असूच शकत नाहीत,” असा टोला बावनकुळेंनी ठाकरेंवर लगावला.

जेव्हा-जेव्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा विषय येतो, तेव्हा एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात महायुती निवडणूक लढणार आहे, असं भाजपकडून सांगण्यात येतं. मात्र भंडा-यात बावनकुळेंनी थेट फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं विधान केल्यानं शिंदे गटाची धडधड वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

वाचा : Hot Water Drinking | गरम पाण्यासोबत तूप पिण्याचे अज्ञात फायदे जाणून घेऊन तुमचे आयुष्य वाढवा वाचा सविस्तर …

बावनकुळेंनी केलेल्या विधानाबाबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांना विचारण्यात आलं असता, ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत. त्यांची कार्यशैली आणि नेतृत्व क्षमता सर्वांना माहीत आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.”

दरम्यान, संजय राऊतांनी बावनकुळेंवर परदेशात कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. “आपण मकाऊमध्ये ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तिथला हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे,” असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

Web Title : Devendra Fadnavis Will Devendra Fadnavis be the Chief Minister again? Chandrasekhar Bawankule’s statement caused excitement in the Shinde group

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button