दिवाळीपूर्वी पिक विमा, नुकसान भरपाई शेतकर्यांच्या खात्यात येणार का? पहा या विषयी सविस्तर माहिती..
शेतकऱ्यांच्या मनात सतत येणारा प्रश्न म्हणजे, दिवाळीपूर्वी पीक विमा किंवा नुकसान भरपाई खात्यात येणार का? याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. राज्यातील पिक विमा कंपन्याना विमा हप्त्याची मागणी केलेली आहे. मागणी ताबडतोब देण्यात यावी जेणेकरून दिवाळीपूर्वी शेतकर्यांना पिक विमा त्यांच्या खात्यात क्रेडीट केला जाईल. अशी मागणी राज्याच्या कृषीमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केलेली आहे.
973 कोटी रुपयांची रक्कम वितरित –
राज्य शासनाच्या माध्यमातून ९७३ कोटी रुपयाची विमा हप्त्यासाठी पहिल्या हप्त्याची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. आणि केंद्र शासनाला ९७० कोटीची मागणी केलेली आहे. हि माहिती देण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या हप्त्याबरोबर केंद्र शासनाचा पहिला हप्ता वितरीत झाला तर ताबडतोब शेतकर्याला विमा मिळायला मदत होणार आहे.
अतिवृष्टीच्या मदतीसाठी तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून अकाउंट नंबर, IFSC कोड याचे व्हेरिफिकेशन तसेच शेतकर्यांच्या जमिनीचे व्हेरिफिकेशन व त्याच्याबद्दलची माहिती शेतकर्यांकडून व्हेरीफाय केली जाते. जेणेकरून हि माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देईल तेव्हा अतिवृष्टी भरपाईची मदत वितरीत केली जाईल व शेतकर्याच्या खात्यामध्ये हि रक्कम वितरीत करण्यासाठी मदत होते. नुकसान भरपाई तसेच पिक विम्याची मदत दिवाळीपूर्वी येण्याच्या हालचाली आहेत. आणि अशाच प्रकारच्या या मागणी राज्याच्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्याकडे केली आहे.
वाचा – पीक पाहणी नाही केली तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा राहणार का? पहा याविषयी सविस्तर माहिती..
पिक विमा कंपन्यामुळे पिक विमा मिळण्यास अडचण येत आहे, या बातमीत तथ्य नाही. पिक विमा त्याचबरोबर अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीनंतर येणाऱ्या काही कालावधीमध्ये शेतकर्यांच्या खात्यामध्ये क्रेडीट होऊ शकते. अशी माहिती दिलेली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा