युरिया बाबत मोठा निर्णय याचा थेट शेतकऱ्यांना लाभ मिळणार का?
Will a big decision on urea directly benefit farmers? Read detailed news
देशांमध्ये युरिया उत्पदन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्याकरता केंद्रसरकार ठोस पावले देखील उचलत आहेत. तलचर फर्टिलायझर्स लिमिटेडद्वारे कोळसा गॅसिफिकेशनने (कोळसा गॅसद्वारे) उत्पादित युरिया करिता विशेष अनुदान देण्याचे धोरण केंद्र सरकारने मंजूर केले आहे.
या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असे आहे युरिया क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या संदर्भात बोलताना पियुष गोयल म्हणाले युरिया खतामधील उत्पदन वाढविल्यास परकीय चलनामध्ये बचत होईल. या प्रकल्पावर सरकार सुमारे 13,277 कोटी रुपये खर्च करेल. यामुळे युरिया मधील आयात 12.7 लक्ष टन कमी होणार आहे.
कोळसा गॅसिफिकेशन?
कोळसा गॅसिफिकेशन या प्रक्रियेमध्ये कोळसा थेट घन अवस्थेमध्ये परिवर्तीत होतो व नंतर त्याचे गॅस मध्ये रुपांतर केले जाते.
याचा शेतकऱ्यांना फायदा कसा होणार?
सरकारचे असे म्हणणे आहे की देशामध्ये कोळशाचा साठा मुबलक प्रमाणात आहे याचा उपयोग देशाच्या शेतकऱ्यां करता युरिया खताचे उत्पादनासाठी करावा याने आयात देखील कमी होऊन आयात बिल कमी होईल तसेच शेतकऱ्यांना युरिया कमी दरात प्राप्त होईल.
अनुदानामुळे शेतकऱ्यांना स्वस्त युरिया मिळतो. खत अनुदानासाठी (Fertilizer subsidy) सरकार दरवर्षी 75 ते 80 हजार कोटी रुपयांची व्यवस्था करते.
हे ही वाचा
१) सोयाबीनचे “ह्या” आहेत नवीन जाती पहा काय वैशिष्ट्य आहे या नवीन जाती मध्ये…
२) अशी करा मत्स्यशेती व घ्या मत्स्यशेतीचे अशी काळजी वाचा इतंभूत बातमी