ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Wildlife Attack | वन्यप्राणी हल्ल्यामुळे नुकसान झाल्यास ऑनलाईन अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर …

Wildlife Attack | How to apply online for damage due to wildlife attack? Read more...

Wildlife Attack | वन्यप्राणी हल्ल्यामुळे मनुष्य, पशुधन किंवा शेतीचे नुकसान झाल्यास, (Wildlife Attack) नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा वन विभागाकडून उपलब्ध आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

 1. वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahaforest.gov.in) भेट द्या.
 2. मुख्यपृष्ठावर “फॉरेस्ट पोर्टल” वर क्लिक करा.
 3. नवीन पेजवर “वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानी करता नुकसान भरपाई मंजूर करणे” या पर्यायावर क्लिक करा.
 4. ॲप्लिकेशन फॉर्म उघडेल, त्यात मनुष्य, पशुधन किंवा शेती यापैकी नुकसान झालेल्या प्रकारानुसार निवड करा.
 5. संबंधित माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा.
 6. अर्ज जमा करा आणि पावती डाउनलोड करा.

वाचा | Wildlife Attack | राज्य शासनाचा मोठा निर्णय! वन्यप्राण्यांच्या हल्ला नुकसान भरपाईत वाढ; मृत्यू झाल्यास 25 लाख तर जखमी झाल्यास ‘इतके’

नुकसान भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे:

 • मनुष्य जखमी/मृत्यू: घटना घडल्याचा दिनांक आणि संबंधित वन अधिकाऱ्यांना कळविल्याचा घोषणापत्र, मृत व्यक्तीची ओळखपत्रे, वैद्यकीय उपचारांचे बिल, मृत्यू प्रकरणी वारसदाराचे बैंक खाते तपशील, ग्रामपंचायतीचा दाखला, पोलीस पंचनामा.
 • पशुधन मृत्यू: घटना घडल्याचा दिनांक आणि संबंधित वन अधिकाऱ्यांना कळविल्याचा घोषणापत्र, मृत जनावराचे शव न हलविल्याचे प्रमाणपत्र, अर्जदाराचा बैंक खाते तपशील.
 • पीक नुकसान: घटना घडल्याचा दिनांक आणि संबंधित वन अधिकाऱ्यांना कळविल्याचा घोषणापत्र, नमुना ७/१२, नकाशाची प्रत, ग्रामपंचायतीचा दाखला, बैंक खाते तपशील.

अर्ज करण्याची अंतिम मुदत:

 • मनुष्य जखमी/मृत्यू: ४८ तास
 • पशुधन मृत्यू: ४८ तास
 • पीक नुकसान: ३ दिवस

अधिक माहितीसाठी:

 • वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या (mahaforest.gov.in)
 • वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा

Web Title | Wildlife Attack | How to apply online for damage due to wildlife attack? Read more…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button