योजना
Widow Pension Scheme | विधवा महिलांना महिन्याला मिळणार आर्थिक आधार! काय आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना?
Widow Pension Scheme | Widowed women will get monthly financial support! What is Indira Gandhi National Widow Pension Scheme?
Widow Pension Scheme | राज्यातील दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना (Widow Pension Scheme) राबवण्यात येते. या योजनेद्वारे, लाभार्थी महिलांना दर महिन्याला ₹1500/- पेन्शन दिले जाते.
- योजनेचा उद्देश
- विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
- महिलांचे जीवनमान सुधारणे.
- मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी इतर व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज कमी करणे.
- योजनेचे लाभार्थी
- दारिद्र्यरेषेखालील विधवा महिला.
- महाराष्ट्रातील 15 वर्षांपासून रहिवासी असलेली.
- 40 ते 70 वर्षे वयोगटातील.
वाचा | Disability Pension Scheme | अपंगांसाठी आनंदाची बातमी! आता दरमहा मिळणार 600 रुपये पेन्शन; पहा काय आहे पात्रता…
- आवश्यक कागदपत्रे
- विहीत नमुन्यातील अर्ज.
- वयाचा पुरावा.
- पतीच्या मृत्यूचा दाखला.
- मोठ्या मुलाचा वयाचा दाखला.
- आधार कार्ड.
- रेशन कार्ड.
- निवडणूक ओळखपत्र.
- बँक पासबुक.
- रहिवासी दाखला.
- अर्जदाराचा फोटो.
- अर्ज कसा करावा?
- जवळच्या तहसील कार्यालयातील सेतु केंद्राला भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate या लिंकवर क्लिक करा.
Web Title | Widow Pension Scheme | Widowed women will get monthly financial support! What is Indira Gandhi National Widow Pension Scheme?
हेही वाचा