महाराष्ट्रात गारपीटीची सह पावसाचा तडाका अजूनही तीन दिवस पावसाची शक्यता का पडतोय अवकाळी पाऊस?
Why is there still a possibility of three days of unseasonal rains in Maharashtra with hailstorm? Read in detail
मध्य महाराष्ट्र, वऱ्हाड, आणि मराठवाड्यात दिवसापासून गारपिटीचा सह अवकाळी पाऊस पडत आहे. नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, पुणे, नाशिक, पुन्हा गारपीट झाली. त्यामुळे कांदा,गहू,हरभरा,आंबा,केळी द्राक्ष,या पिकांचे मोठे नुकसान झाले.
एकीकडे कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजनुसार राज्यातल्या अनेक शहरांत, ग्रामीण भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. (Weather Alert Unseasonal Rains In maharashtra Winds And Rains Next two or three Day)
ढगाळ वातावरणामुळे उकड्यात वाढ झाली असली तरी कमाल तापमानात घट झाली आहे. ही स्थिती तीन दिवस राहणार असून मराठीतील अनेक भागात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्र,कोकण, मराठवाडा, व विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.
कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक किनारपट्टी ते गोव्यामार्गे आता मध्य महाराष्ट्रापर्यंत आले आहे.त्यामुळे पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊसाची हजेरी लागली. मावळ तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.तसंच काही ठिकाणी गारपीटही झाली.
गेली अनेक दिवस नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत, या पावसाने मात्र ते सुखावले आहेत. बारामती शहर आणि परिसरात पावसाने रविवारी सायंकाळच्या च्या सुमारास जोरदार हजेरी लावली. शहर आणि तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस पडला. उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना थोडासा गारवा मिळाला.अहमदनगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस बरसला. तसंच जिल्ह्यातील ग्रामीण भागांत मुसळधार गारांचा पाऊस झाल्याने पिकांचं नुकसान झालं.(Weather Alert Unseasonal Rains In maharashtra Winds And Rains Next two or three Day) सिन्नर तालुक्यातील माळवाडी परिसरात तुफान पाऊस झाला. या पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालं
Thanks For the news