पशुसंवर्धन

“या” बैलाची किंमत पहिली का? तब्बल 1 कोटी रुपयांना विकला गेला..

Why is the price of this bull first? Sold for Rs. 1 crore.

या जातीच्या बैलाच्या किंमती बद्दल ऐकलं नसेल. पण बंगळुरूमध्ये 11 नोव्हेंबर रोजी चार दिवसीय कृषी मेळाव्याचं (Krishi Mela) आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात एका खरेदीदाराने कृष्णा बैलाला 1 कोटी रुपयात खरेदी केली. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

या जातीच्या बैलाचं वीर्याची खूप मागणी असते –

हा हल्लीकर जातीचा बैल आहे. बैलाच्या मालकाने सांगितलं की, हल्लीकर जातीच्या बैलाचं स्पर्म म्हणजेच वीर्याची खूप मागणी असते. ते पुढे म्हणाले की, त्याच्या वीर्याचा एक डोज एक हजार रुपयांमध्ये विकला जातो.

1 कोटी रुपयांत खरेदी केला –

हल्लीकर जातीच्या जितक्याही गायी आहेत त्याच्या दुधात जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. बैलाच्या मालकाने सांगितलं की, मात्र आता ही जात हळू हळू लुप्त होत आहे. कृष्णा बैलाला खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हजार, लाख नाही तर कोटींची बोली लावली. बैल मालकाने सांगितलं की, मेळाव्यात एका खरेदीदाराने कृष्णा बैलाला 1 कोटी रुपयात खरेदी केली.

वजन 800 ते 1000 किलोपर्यंत –

बैलाच्या लिलावाचा आनंद मालकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. बोरेगौडा यांनी सांगितलं की, कृष्णाचं वय साडे तीन वर्षे असते तरी तो मोठ मोठ्या बैलांना मागे सोडते. या मेळाव्यात सर्वसाधारण बैल एक ते दोन लाखांना विकले जातात. मात्र इतका महाग बैल विकला जात नाही. या बैलांची खासियत म्हणजे त्यांचं वजन 800 ते 1000 किलोपर्यंत असतं, आणि उंची 6.5 फूट ते 8 फूटांपर्यंत असते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button