प्रश्न तुमचे उत्तर आमचे:
उत्तर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा खते बियाणे मिळेल नाहीतर या नंबर वर करा कॉल…कोरोना च्या पार्श्वभूमीवर शेती विषयक गोष्टींचा पुरवठा सुरळीत चालावा याकरिता कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी आयुक्तालय नियंत्रण कक्षाची उभारणी केली आहे.
कृषी आयुक्त स्तरावरील नियंत्रण कक्ष हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. कोरोना च्या काळामध्ये खते बी-बियाणे तसेच इतर अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी 8446117500 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच राज्य सरकार द्वारे18002334000 या टोल फ्री क्रमांक जारी केले असून काही अडचण आल्यास अडचणीचे निवारण येथे केले जाईल.
तसेच खालील मेल वर आपण संपर्क करू शकता.
[email protected]
वरील दोन्ही हेल्पलाईनवर तुम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधू शकता.
ही माहिती खूप महत्त्वाची आहे तरी आपण थोडासा वेळ काढून इतरांना नक्की शेअर करा..