शरद पवार ग्रामसमृद्ध योजनामध्ये लाभार्थी होण्यासाठी कुठे व कसा अर्ज कराल?
Where and how to apply to become a beneficiary in Sharad Pawar Gram Samridh Yojana?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोगातून ‘ शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ पुढे आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट या योजनेचे प्रमुख उदिष्ट आहे.
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील.या योजनेतुन शेतकरी मित्रांना लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, तसेच नाडेप कंपोस्टिंग यासाठी लाभ मिळणार आहे..
👉 या योजनेचा अर्ज कसा करायचा?
📌 योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
📌 हा अर्ज सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी
यांच्याकडे करावा.
📌तुम्हांला हे अनुदान मनरेगा अंतर्गत दिले जाते, त्यामुळे या अनुदान अंतर्गत एका लिस्ट दिली जाते त्या लिस्ट मध्ये नाडेप कंपोस्टिंग, गाय म्हैस गोठ्यांचं कॉंक्रीटिकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवं त्यावर खूण करून हा अर्ज देणे गरजेचे आहे.
👉कोण असेल या योजनेस पात्र?
अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचीत जमा,अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी.
या योजनेसाठी लाभार्थी होण्यासाठीच्या अटी…
📌 या योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असावा.
📌लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
📌लाभार्थीचा व्यवसाय हा शेती असावा म्हणजेच तो शेतकरी असणे अनिवार्य आहे.
📌लाभार्थीकडे स्वतःचे आधारकार्ड, ओळखपत्र, राशनकार्ड, रहिवासी दाखला, अशी कागदपत्रे देणे आवश्यक आहे.