कृषी तंत्रज्ञान

‘ड्रोनच्या’ माध्यमातून शेतातील कीटकनाशक फवारणी करताना, यासाठी आहे काय मार्गदर्शन तत्वे वाचा सविस्तरपणे…

When spraying farm pesticides through 'drones', read in detail what the guidelines are for

अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. पारंपारिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व त्याचप्रमाणे खर्चिक असते. अत्याधुनिक तंत्रचा (Sophisticated technique) उपयोग केल्यास खर्च कमी होतो त्याचप्रमाणे वेळेमध्ये बचत होते. ड्रोन च्या माध्यमातून आलिकडच्या काळामध्ये कीटकनाशकाची (Of pesticides) फवारणी केली जाते, त्याविषयक मार्गदर्शन तत्वे काय आहेत ते पाहू..

पिकांच्या कीटकनाशक (Pesticides) फवारणी करण्यासाठी ड्रोन चा उपयोग केला जातो. शेती, वनीकरण, पिके नसलेले क्षेत्र इत्यादी पिकाच्या संरक्षणासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करने सहज शक्य होते. परंतु ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करण्याकरिता काही मार्गदर्शक तत्वे देखील आहेत. कीटकनाशके अधिनियम 1968 (नियम 43) आणि कीटकनाशके नियम (97) च्या तरतुदीनुसार.

वाचा : ‘सीएनजी’ ट्रॅक्टर्समुळे शेतकऱ्यांना होणार भरघोस फायदा!

  • जमिनीचं क्षेत्र चिन्हांकित करणे ही ड्रोन ऑपरेटरची जबाबदारी असेल.
  • ऑपरेटर केवळ मंजूर कीटकनाशके आणि त्यांचे फॉर्म्युलेशन वापरेल.
  • परवानगी दिलेल्या उंचीच्या वर ड्रोन उडवता येणार नाही.
  • ऑपरेटरद्वारे प्रथमोपचार सुविधा पुरविल्या जातील.
  • ड्रोन उडवण्याासठी आजूबाजूच्या लोकांना किमान चोवीस तास अगोदर माहिती दिली पाहिजे.
  • अधिकाऱ्यांना 24 तास अगोदर सूचना देणं आवश्यक आहे.
  • ड्रोनद्वारे ज्या भागात फवारणी केली जाणार असेल तिथं इतर व्यक्तीं आणि पाळीव प्राण्यांना प्रवेश देऊ नये.
  • ड्रोनचं संचालन करणाऱ्या व्यक्तींना किटकनाशकं, त्यांचा प्रभाव या संदर्भात प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे.
  • फक्त दिवसाच्या उजेडात ड्रोनचा वापर करा.संध्याकाळी किंवा रात्री तो करू नये.
  • विमानतळ आणि हेलिपोर्ट्स जवळ ड्रोन उडवता येणार नाहीत.
  • अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतल्याशिवाय खासगी मालमत्तेवर ड्रोनचा वापर करता येणार नाही.
  • केवळ डीजीसीए प्रमाणित चालकांना कृषी ड्रोन उडण्याची परवानगी दिली जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

1. कलिंगडच्या बियांचा उपयोग, घरातील व इमारतीच्या भेजा बुजवण्यासाठी “प्री मिक्सरला पर्याय ठरणार का?

2. SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button