अलीकडील काळामध्ये अनेक लोक ऑनलाइन शॉपिंगला (shopping) पसंती देत असतात, कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाइन (Online) शॉपिंगची क्रेज (Craze) प्रचंड वाढत गेली. ऑनलाइन शॉपिंगमध्ये दिली जाणारी सुट (Suite) त्याचप्रमाणे बाहेर न जाता घरपोच सेवा व वाचणारा वेळ यामुळे अधिक लोक ऑनलाइन शॉपिंगला पसंती देतात.
अनेक वेळा ब्रँडेड मोबाईल, (Mobile) तसेच अन्य वस्तू ऑनलाईनद्वारे मागवले जातात. अनेकदा ब्रँडेड वस्तूंच्या नावाखाली बनावट आणि खोट्या वस्तू विकल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला मोठी फसवणूक टाळता येईल. आज आपण ऑनलाईन शॉपिंग (Online shopping) करताना कोणती काळजी घ्यायची हे पाहुयात:
1) ब्रॅण्डेड वस्तूच्या नावाची स्पेलिंग चेक करा: (Check the spelling of the name of the branded item) बरेचदा, ब्रँडेड (Branded) वस्तूंच्या नावाने बोगस वस्तू विकली जाते, ब्रॅण्डेड वस्तूचे नावांमध्ये छेडछाड करून लोकांची फसवणूक करण्यात येते. त्याकरता ब्रँडेड वस्तू च्या नावाची स्पेलिंग चेक करा.
2) किंमतीवर लक्ष द्या: (Note the price) बरेचदा शॉपिंग (Shopping) करत असताना, कमी किमतीचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक (Cheating) केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी सावधगिरी (Caution) बाळगून वस्तू खरेदी करण्याआधी एमआरपी (MRP) तपासा. तसेच शॉपिंग वेबसाईट तुम्हाला किती टक्के सूट देण्याची ऑफर देतेय तेही पाहा. जर ऑफर 80 टक्क्यांपेक्षा अधिक सूट देणारी असेल तर सावध व्हा.
3) इतर ग्राहकांचे अनुभव वाचा : (Read other customer experiences) ऑनलाइन (Online) वस्तू खरेदी करताना इतर ग्राहकांचे अनुभव म्हणजेच रिव्यू (Review) वाचा, जेणेकरून तुम्हाला त्या वस्तूची खरेदी करण्याआधी माहिती मिळेल. बऱ्याचदा ग्राहकांना फसवणे करिता खोटे फोटो किंवा उत्तम क्वालिटीचे फोटो टाकले जातात, प्रत्यक्षात मात्र प्रॉडक्ट (Product) वेगळेच निघते. याकरता इतर ग्राहकांचे (Of customers) रिव्यू वाचणे आवश्यक आहे.
4) खोटी वेबसाईट : (False website:)
आज कल सोशल मीडिया तसेच ऑनलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणात फ्रॉड वाढत चालले आहे, ऑनलाइन शॉपिंग मुळे खोट्या वेबसाईट देखील तयार केल्या जातात यापासून वेळीच सावध राहणे आवश्यक आहे.
त्याकरता त्या वेबसाइटची सत्यता तपासा, गुगलवर वेबसाईटची रँकिंग आणि रिव्ह्यू (Ranking and Review) पाहता येईल.
हेही वाचा:
1. मोबाईल चार्ज करताना कोणती काळजी घ्यावी? अन्यथा होईल मोबाईल बॅटरीचे नुकसान! वाचा सिम्पल ट्रिक्स…
2. हिंगोली जिल्ह्याला केंद्रसरकार कडून मोठे पॅकेजचे गिफ्ट! वाचा सविस्तर बातमी…