इतर

आज काय विशेष : रक्त दान, श्रेष्ठ दान!

What's special today: Blood donation, great donation!

रक्तदान (Blood donation) हेच श्रेष्ठदान असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे़ मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते थॅलसिमीया, (Thalassemia) सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते.

हेही वाचा : मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?

[metaslider id=4085 cssclass=””]

राज्यात शासकीय, खासगी अशा सुमारे साडेतीनशे रक्तपेढ्या आहेत. प्रत्येक रक्तपेढ्यांची रक्त साठविण्याची क्षमता त्यांच्या यंत्रणेनुसार वेगळी आहे. त्यात इंडियन रेडक्रॉस (Indian Red Cross) सोसायटीच्या २५ रक्तपेढा आहेत. त्यात जळगाव शाखेची जवळपास पाच हजार रक्तपिशवी संकलन करण्याची क्षमता आहे. त्यात १ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ पर्यंत सुमारे साडेअकरा हजार रक्तपिशव्यांचे संकलन, तर सुमारे पंधरा हजार रक्तपिशव्या गरजू रुग्णांना देण्यात आल्या.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते.

हेही वाचा : मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?

मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.

हेही वाचा :


1)या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?

2)‘या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button