पीएम किसान योजनेत तब्बल 42 लाख अपात्र लाभार्थ्यांनी, काय होणार यांच्यावर कारवाई? वाचा सविस्तर बातमी…
What will happen to 42 lakh ineligible beneficiaries in PM Kisan Yojana? Read detailed news
शेतकरी बांधवासाठी भारत सरकार काहीं (Government of India somewhere) ना काही योजना काढत असते. त्यातील एक योजना म्हणजे,
PM शेतकरी सन्मान निधी योजना होय. (PM Shetkari Sanman Nidhi Yojana.)या योजनेचा उद्देश गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळावा. तसेच बियाणे, खते खरेदी करण्यासाठी रक्कम दिली जाते. सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. 2000 रुपयांचे तीन टप्यात हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंट वर जमा केले जातात.
या राज्यातील सर्वात जास्त अपात्र शेतकरी (The most ineligible farmers in this state)
पीएम किसान योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या ही आसामा, तामिळनाडू, छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमध्ये असल्याचं समोर आले आहे.कृषी मंत्री याच्या माहितीनुसार, आसाममध्ये 8 लाख 35 हजार 268 अपात्र, तामिळनाडूत 7 लाख 22 हजार 271 अपात्र लाभार्थी,छत्तीसगडमध्ये 58 हजार 289 अपात्र लाभार्थी,बिहारमध्ये 52 हजार 178 अपात्र लाभार्थी असल्याचे नमूद केले आहे.
सोयाबीन पिकावर खोड अळींचे संकट! शेतकऱ्यांना अळींचा प्रादुर्भाव झाल्यास पीक विम्याचे कवच मिळणार का?
अपात्र शेतकऱ्यांवर काय कारवाई होणार? (What action will be taken against ineligible farmers?)
केंद्र सरकारनं राज्य सरकारांना अपात्र लाभार्थी शोधून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यांच्याकडून हप्त्याची रक्कम वसूल करण्याचे आदेश ही देण्यात आले आहे.
कोण आहेत अपात्र? (Who are ineligible?)
• असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी
• घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.
• केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)
• केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला देखील याचा लाभ नाही.
• मागच्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी योजनेच्या फायदा मिळणार नाही.
• तुम्ही दुसऱ्याची जमिन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही
• नोंदणी प्रक्रियेत मुद्दाम चूक करणाऱ्यांना देखील फायद्यापासून वंचित राहावं लागेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :
बँकच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास काय करावे? चोरीला गेलेली रक्कम परत मिळू शकेल का?