ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे असणार? काय आहे हवामान खात्याचा अंदाज? पहा सविस्तर..

हवामान खात्याने (weather department) आज दक्षिण भारतासह ओडिशा किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील हलका पाऊस सांगितला आहे.

वाचा –

त्यामुळे येत्या तीन चार दिवसांत ईशान्य भारतात (india) अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस याठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.

वाचा

पुढील 5 दिवस महाराष्ट्रात हलका ते तुरळक पावसाची शक्यता –

तसेच महाराष्ट्रात मात्र पुढील पाचही दिवस कोरड्या हवामानाची व हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने (weather department) आज रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या 3 दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात धुक्याचे साम्राज्य पसरल्यानंतर, मुंबईसह पुणे आणि कोकण परिसरात भयंकर वातावरण तयार झालं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button