कृषी सल्ला

बँकच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास काय करावे? चोरीला गेलेली रक्कम परत मिळू शकेल का?

What to do if money is stolen from a bank account? Can the stolen money be recovered? Read in detail

सध्या डिजिटल युग सुरू आहे, डिजिटल युगाचे (Of the digital age) फायदे आहेत त्यापेक्षा अधिक तोटे आहेत, ऑनलाईन (Online) पद्धतीने अनेक वेळा फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मोठा आर्थिक तोटा (Financial loss) देखील सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या काळामध्ये सायबर गुन्हेगारीत (In cyber crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, बँक खात्यातील सर्व माहिती काढून हॅकर्स खात्यातून (From the hackers account) पैसे लंपास करत आहेत. अश्या वेळी पैसे गेल्यास काय करावे हे पाहू :

SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…

रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ग्राहकांना सतर्क करत असते, कोणतेही अज्ञान व्यक्तीस, कोणत्याही प्रकारची माहिती किंवा ओटीपी (OTP) देणे टाळा. त्याचप्रमाणे तुमची फसवणूक झाली असेल तर त्याची सूचना बँकेस लगेच कळवा.

बऱ्याच वेळा बँका सायबर गुन्हेगारी (Cybercrime) लक्षात घेऊन, विमा पॉलिसी (Insurance policy) बँक देते. अशी पॉलिसी तुमच्या बँकेने काढले असेल तर निश्चितच मदत होऊ शकेल आपल्याशी झालेल्या फसवणुकीची सर्व माहिती बँक थेट विमा कंपनीला सांगेल आणि तेथून विमा पैसे घेऊन आपल्या नुकसानीची भरपाई करेल. सायबर फसवणूक टाळण्यासाठी विमा कंपन्या लोकांना थेट कव्हरेज (Coverage) देत आहेत.

इन्व्हेस्टमेंट टिप्स : ‘फक्त’ 5 रुपयात ‘या’ बँकेत खाते उघडा आणि मिळावा पासबुक, विम्याच्या सुविधांसह अनेक फायदे..

बँकेच्या खात्यातून पैसे चोरीला गेले असतील तर, तीन दिवसाच्या आत मध्ये बँकेला कळवणे अनिवार्य आहे.आरबीआयने असेही म्हटले आहे की, ग्राहकांच्या खात्यातून फसव्या पद्धतीने काढलेली रक्कम निश्चित वेळेत बँकेला कळविल्यानंतर 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यावर परत केली जाईल. आठवड्यानंतर अशी तक्रार (Complaint) केल्यास पंचवीस हजार रुपये पर्यंत तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.

जर तुमचे बचत खाते असेल आणि तुमच्या बँकेच्या खात्यातून दहा हजारापर्यंत अनाधिकृतपणे (Unofficially) व्यवहार झाला असेल तर बँक तुम्हाला पाच हजार रुपये पर्यंत रक्कम देऊ शकते. उर्वरित पाच हजार रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागते.

हे ही वाचा :

1. SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…

2. इन्व्हेस्टमेंट टिप्स : ‘फक्त’ 5 रुपयात ‘या’ बँकेत खाते उघडा आणि मिळावा पासबुक, विम्याच्या सुविधांसह अनेक फायदे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button