अनेकदा कळत नकळत आपणास मधमाशी (Bee) किंवा गांधीलमाशी (Gandhimashi) चावत असते, अशा वेळी काय करावे कोणते घरगुती उपाय करावेत हे आपण समजत नाहीत. मधमाशी चावलेल्या त्या जागेवर सौम्य वेदना, खाज येणं, माशी चावल्याच्या जागी पांढरा डाग, त्वचेवर लालसरपणा, सूज अशी लक्षण आढळतात. तसेच अनेक वेळा मधमाशीचा चावा घेतल्या नंतर त्याचा काटा रुतून राहतो. चला तर आपण पाहू मधमाशी किंवा गांधीलमाशी चावल्यावर काय उपाय योजना कराव्यात.
मधमाशी चावल्यानंतर सौम्य वेदना, खाज येणं, माशी चावल्याच्या जागी पांढरा डाग, त्वचेवर लालसरपणा, सूज अशी लक्षण आढळतात. लहान चिमटा मदतीने त्वचेमध्ये अडकलेला मधमाशीच्या पंखाचा भाग काढा. तो भाग साबणाने स्वच्छ (Clean with soap) करा. त्यावर बर्फ लावा. बर्फामुळे वेदना (Pain due to ice) आणि सूज कमी होण्यास मदत होते.
HEALTH TIPS: आपल्याला निरगिलीचे आयुर्वेदिक फायदे माहिती आहेत का? वाचा निरगिलीचे महत्त्व…
मधमाशी चावल्यानंतर सर्वांत आधी चावलेल्या जागेवर कार्डच्या साहाय्याने दाब तयार करावा. जर त्या जागेवर काटा राहिला असेल तर तो कार्डाच्या मदतीने निघून जाईल. जर काटा तसाच राहिला तर शरीरात विष (Poison) पसरू लागते. यामुळे व्यक्तीला जास्त वेदना होतात.
अशा स्थितीत व्यक्तीने तातडीने त्या चावलेल्या जागेवर बर्फाच्या तुकड्याने सुमारे १५ ते २० मिनिटे चोळावे.असे केल्याने सूज येणार नाही. बर्फामुळे रक्तप्रवाह मंद होतो आणि सूज येत नाही. त्या जागेवर त्वरित टूथपेस्ट लावावी. टूथपेस्टमध्ये (In toothpaste) अल्केलाइन असल्यामुळे विषारी दंशाच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.
Health tips : ‘आयुर्वेदिक’ हळदीचे पहा गुणकारी फायदे!
पपईसुद्धा (Even papaya) खूप फायदेशीर आहे. पपईचा छोटासा तुकडा त्या जागेवर लावावा. पपईत असलेल्या पापेन नावाच्या एंझाइम्समुळे विषारी दंशाचा परिणाम कमी होत जातो. मधामध्ये जिवाणूविरोधी घटक असतात. यामध्ये असलेल्या हायड्रोजन पेरॉक्साइडमुळे (Due to hydrogen peroxide) रुग्ण लवकर बरा होतो व वेदनाही कमी होतात.
मधमाशी वगैरे चावली तर त्या ठिकाणीसुद्धा कोरफडीचा (Aloe vera) ताजा गर किंवा लिंबाचा रस (Lemon juice) लावण्याने बरे वाटते.
मधमाशीच्या डंकावर मध सह उपचार केला जाऊ शकतो मधमाशी चावल्यानंतर चावलेल्या भागावर मध लावा मधची पेस्ट लावल्याने त्वरित आराम मिळतो आणि विष शरीरात पसरत नाही डंकावर मध लावल्याने जळजळही होत नाही तुम्ही मधात हळद (Turmeric in honey) घालून या दोन्ही गोष्टींची पेस्ट लावू शकता.
‘बहूगुणी’ आवळा जाणून घ्या, त्याचे आयुर्वेदिक महत्व!
मधमाशीच्या डंकावर उपचार करण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरला जाऊ शकतो बेकिंग सोडा (Baking soda) वापरल्याने विष पसरत नाही जळजळ कमी होते आणि वेदनेपासून आराम मिळतो वास्तविक बेकिंग सोडा अल्कधर्मी (Alkaline) असते जो विषाचा प्रभाव नष्ट करतो आणि डंकामुळे शरीरावर कोणतीही हानी होत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घेतल्यास फायदेशीर ठरेल.
हे ही वाचा :
1. एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…
2. भारतीय लोक स्मार्टफोन खरेदी करताना, ‘या’ गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात..