तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या योजना आल्या आहेत व कोण आहेत लाभार्थी? ऑनलाइन पद्धतीने असे पहा …
What schemes have come up in your Gram Panchayat and who are the beneficiaries? See it online
आपल्याकडे काही सरकारी योजना (Government scheme)आल्या तरी बहुतांश नागरिकांना त्याची कल्पना नसते, किंवा आता या योजनेचे कोण लाभार्थी आहे त्याच्याबद्दल ही पुरेशी माहिती नसते, वैयक्तिक लाभ (Personal gain) घेण्यासाठी सरकारची सरकारी योजनांची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये (Gram Panchayat) ग्रामसेवक अशा सरकारी योजनांची चौकशी केला असता तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेलच याची खात्री नाही, चला तर आपण ग्रामपंचायतमध्ये कोणत्या सरकारी योजना आल्या आहेत व त्यासाठी कोण लाभार्थी ठरले आहे ती आपण मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या पाहू शकतो.
राज्यामध्ये अनेक वेळा सरकारी योजना राबविल्या जातात त्यामध्ये फळबाग लागवड योजना, (Orchard planting scheme) सिंचन विहीर योजना, नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती योजना, शरद पवार ग्राम समृद्धी योजना, (Sharad Pawar Gram Samrudhi Yojana) अशा अनेक योजनांचा समावेश असतो. या योजनेचे लाभार्थी कोण आहेत याची माहिती आपण घेणार आहोत चला तर आपण पाहुयात या बद्दल संपूर्ण माहिती…
यासाठी पुढील दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
https://nrega.nic.in/netnrega/HomeGP.aspx
ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद नावाचा एक ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला हवी असणाऱ्या माहिती वर क्लिक करू शकता उदाहरणार्थ ग्रामपंचायत
ग्रामपंचायत या ऑप्शनला क्लिक केले असता एक पेज ओपन होईल त्यावर जनरेट रिपोर्ट (Generate report) नावाच्या ऑप्शनला क्लिक करा.
हे ही वाचा :शेतकरी गटांनी धरली जैविक निविष्ठांची कास! शेती लगतच उभारली जैविक प्रयोगशाळा, वाचा शेतकरी गटाची यशोगाथा…
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर विविध राज्यांची नावे दाखवली जातील, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे (Of the State of Maharashtra) नाव सिलेक्ट करावे, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे तालुक्याचे व गावाचे नाव सिलेक्ट करावे.
असे केल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत बोर्ड दिसेल तिथे आर फाइव च्या अंतर्गत वर्क एक्सपेंडिचर (Work expense) नावाचे ऑप्शन आहे ते ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल. यामध्ये तुमच्या गावात राबविण्यात येणारे सरकारी योजना व त्याचे लाभार्थी याची संपूर्ण माहिती दिसेल.
हे ही वाचा :
एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? जाणून घ्या क्रेडिट कार्ड चे हिडन चार्जेस..